BMC exit poll  Saam tv
मुंबई/पुणे

२५ वर्षांनंतर ठाकरेंनी मुंबईची सत्ता गमावली, कोणती शिवसेना ठरली अव्वल? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय

BMC exit poll : २५ वर्षानंतर ठाकरेंनी मुंबईची सत्ता गमावल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसतंय. तर या पोलमध्ये शिंदे गटापेक्षा ठाकरे सेना अव्वल ठरल्याचे पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आलाय

ठाकरे गटाला धक्का बसलाय

मुंबईत २५ वर्षानंतर सत्तांत्तर

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तसंस्थाचे एक्झिट पोल हाती येऊ लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं. मुंबई महापालिका निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर 'आजतक' हिंदी वृत्तवाहिनीचा एक्झिट पोलचा हाती आला आहे. या एक्झिट पोलमध्ये ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. २५ वर्षांनंतर ठाकरेंनी मुंबईची सत्ता गमावल्याचे पोलमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही शिवसेनेच्या तुलनेत ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीला ५८ ते ६८ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीला १२ ते १६ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अन्य पक्षाला ६ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एक्झिट पोलनुसार, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला ४२ टक्के मते मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ठाकरे बंधूंना ३२ टक्के मते मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.

एक्झिट पोलनुसार, मुंबईमध्ये भाजप मोठा पक्ष ठरत आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट पाहायला मिळत आहे. त्यापाठोपाठ शिंदे गट पाहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा कमी होण्याच्या शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त १६ जागा दाखवण्यात येत आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपने यंदा जागा राखल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या शुभारंभासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा मेट्रोतून प्रवास

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Without Sugar Tea: चहामध्ये साखर टाकणे बंद केल्यास शरीरात होतात 5 मोठे आश्चर्यचकित बदल

Political News : शिंदे सेनेच्या आणखी एका नगरसेवकाच पद धोक्यात, अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावली नोटीस

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT