Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray Vs Shinde: 'या' बाबतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मागे टाकलंय...

Satish Kengar

>> प्रसाद जगताप

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde:

शिवसेनेच्या फुटीपासूनच ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष असो शाखा असो चिन्ह असो अथवा कार्यकर्ते असो, प्रत्येक गोष्टीत अव्वल राहण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. यात अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे गटाला मागे टाकलंय. पण यावेळी मात्र ठाकरे गटाने बाजी माजी मारली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातल्या या तुलनेत उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आहे. बाजी मारली पण नेमकी कशात हे जाणून घेऊ...

मुख्यमंत्री सहायता निधीत कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात सर्वाधिक निधी जमलाय, कोणत्या मुख्यमंत्र्याने आपल्या काळात सर्वाधीक गरजूंना मदत केली आणि कोणते मुख्यमंत्री यात पिछाडीवर आहेत. याची आकडेवारी आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या कार्यकाळातील ही आकडेवारी आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या आधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे. ज्याची आकडेवारी धक्कादायक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं उद्दिष्ट असते. पूर, दुष्काळ आणि आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते. त्याचबरोबर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. राज्यातील अनेक दानशूर लोकं मुख्यमंत्री सहायता निधीत भरभरुन देणगी देतात. (Latest Marathi News)

सहायता निधीत कोणते मुख्यमंत्री पिछाडीवर?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिछाडीवर आहेत. मागील 3 मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी विशेष देणग्या आणल्या नसून यावर्षी केवळ 65.88 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले, असल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री सचिवालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती दिली आहे. आताचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीत लक्षणीय वाढ केली असल्याचंही स्पष्ट झालंय.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीची माहिती मागितली होती. मुख्यमंत्री सचिवालयाचे सहाय्यक लेखा अधिकारी संजय तांबे यांनी अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2022 रोजीची शिल्लक रु 418.88 कोटी आणि 31मार्च 2023 रोजी शिल्लक रु 445 .22 कोटी आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्षनिहाय प्राप्त देणग्याची माहिती 1 जानेवारी 2015 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाची तुलना केली तर सर्वांत पिछाडीवर शिंदे आहेत.

निधीत सर्वाधिक वाढ उद्धव ठाकरेंच्या काळात

मुख्यमंत्री असताना 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी 614 कोटींची वाढ केली. तर 2 वर्षात उद्धव ठाकरे यांनी 793 कोटींची वाढ केली आहे. एकनाथ शिंदे यांनी 65.88 कोटींची वाढ केलीये.

गरजूंना मदत करण्यात फडणवीस अव्वल

मागील 8 वर्षात तीनही मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत गरजूंना मदत करण्यात देवेंद्र फडणवीस अव्वल आहेत. फडणवीस यांच्या कार्यकाळात 1 लाख 7 हजार 782 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 63 हजार 573 नागरिकांना 598.32 कोटींची मदत करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी 10 हजार 712 पैकी 4 हजार 247 नागरिकांना 20.28 कोटी रुपयांची मदत केली. तर एकनाथ शिंदे यांनी 14 हजार 566 पैकी 7419 नागरिकांना 57 कोटींची मदत केली.

यातही एक गोष्ट महत्वाची आहे की, देवेंद्र फडणवीसांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात गरजूंना मदत केलीये. तर त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद केवळ 2 वर्षच होतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर केवळ दिड वर्ष होत आहेत, ही देखील महत्वाची गोष्ट आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT