Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. बंडानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर मुलाखत दिली. या मुलाखतीत ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का असा प्रश्न केला, या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, का नाही होणार, आणि तो जर करायचा नसेल तर माझ्या लढाईला काय अर्थ आहे, असंही ठाकरे म्हणाले.

मी दिलेले शिवसेना (ShivSena) प्रमुखांना वचन मुख्यमंत्रीपदाचे आहे. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे. माझा हेतू नव्हता की मी मुख्यमंत्री होईल. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसणार नाही. शिवसेना मला वाढवायची आहे.

लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात मग मी बंडखोरांना दाखवतो, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला.

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे बोलले जात आहे. या बंडानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीची राज्यात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रदर्शित झाला. उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे.

प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील व पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपवाल्यांनो सावधान, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT