Uddhav Thackeray Sanjay Raut Interview Shiv Sena Aavaj Kunacha 
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray News: बंडखोर आमदार 'मातोश्री'च्या दारात आले तर...? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर

Uddhav Thackeray interview: जसे फुटीर पवारांच्या दारात गेले, अशा प्रकारे शिवसेनेतील फुटीर आमदार तुमच्या दारात आले तर? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray Saamana interview:अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार पक्षातून बंड युती सरकारमध्ये सामील झाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या आमदारांनी शरद पवार यांची आतापर्यंत दोन वेळा भेट घेतली. यामुळे विरोधी पक्षांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या भूमिकांवर आक्षेप नोंदवण्यास सुरूवात केली.

दरम्यान, हाच प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीत विचारला. या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्टाईलने उत्तर दिलं.

जसे फुटीर पवारांच्या दारात गेले, अशा प्रकारे शिवसेनेतील फुटीर आमदार तुमच्या दारात आले तर? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "त्यांची माझ्या दारात यायची हिंमतच नाहीये. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची, बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केलं.

"बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळं ढोंग होतं. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे ते म्हणाले होते. आता राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

"बाळासाहेबांचे विचार चोरले वगैरे सगळं ढोंग होतं. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो वगैरे ते म्हणाले होते. आता राष्ट्रवादीच्याच म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेल्या आहेत", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

दरम्यान, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतोय, या शिवसेनेच्या तत्कालीन मंत्र्यांच्या विधानावरही उद्धव ठाकरे यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. "२०१४ ते १९ काळात सत्ता होती तेव्हा याच महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं, म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता".

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT