Sanjay Raut On Manipur Clash Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Manipur Clash: 'चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून...'; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

'चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली.

जयश्री मोरे

Sanjay Raut News: ईशान्येकडील मणिपूरमध्ये हिंसाचाराची ठिणगी पडली आहे. काल हिंसक गटाने केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा अक्षरशः आगडोंब उसळला आहे. मणिपूरच्या या हिंसाचारावर संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 'चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली. (Latest Marathi News)

संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मणिपूर हिंसाचारावर भाष्य करताना राऊत म्हणाले, ' गेल्या तीन महिन्यांपासून या देशातल्या सीमेवरील महत्त्वाचं राज्य मणिपूर हे पूर्णपणे हिंसेच्या आगीमध्ये अडकलेलं आहे. आमदार, त्या त्या राज्याचे मंत्री, केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांचा घर जाळण्यात आलं. लोक निर्वासित झाले. हजारो लोकांनी पलायन केलं आहे. गृहमंत्रालयाचे हे अपयश आहे.

'पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत जायची आणि शक्तिप्रदर्शन करण्याची जोरात तयारी सुरू आहे. लोक मारले जात आहेत, शंभरच्या हून अधिक उग्रवादी घुसले आहेत, त्याच्यावर गृहमंत्री एक शब्द बोलायला तयार नाहीत', अशीही टीका राऊत यांनी केली

'काल 100 हून अधिक उग्रवादी घुसले आहेत. सीमेकडून त्यांना अत्याधुनिक शस्त्र पुरवण्यात आलेली आहेत. तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही. मणीपूरमध्ये घुसलेल्यांना चीनची मदत मिळत आहे. जसा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक केला, तसा चीनमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याची हिंमत आहे का? असा प्रश्न राऊत यांनी मोदी सरकारला केला.

शिवेसनेच्या वर्धापन दिनावर राऊत म्हणाले, 'शिवसेनेचा वर्धापन दिन 19 तारखेला आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. गावच्या जत्रेत जसे तंबू असतात, त्यात खोटे चंद्र असतात. मर्सिडीज गाडी असते, त्यात ती लोक बसून फोटो काढत असतात, त्याप्रकारे हे लोक शिवसेना आपल्या पाठीशी लावून फोटो काढत आहेत. शिंदे गटाची जत्रेतली खोटी शिवसेना आहे '.

'आमचा वर्धापन दिन हा 19 जूनला आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये वाजत गाजत होणार आहे. उद्या आमचं शिबीर वरळीला जोरदार होईल. जत्रा उठायची वेळ झालेली आहे. जत्रा उठली की हे या लोकांचे तंबू देखील उठतील, अशी टीका राऊत यंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: 'जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत, आमदाराने दिले १० ते १५ लाख'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT