मुंबई/पुणे

Sanjay Raut Dasara Melava 2023: अब की बार ठाकरे सरकार...; शिवतीर्थावरून संजय राऊतांनी भाजपसह सत्ताधारी पक्षांना ललकारलं

Sanjay Raut Dasara Melava 2023: ' २०२४ मध्ये भाजपचा माज उतरणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली.

Vishal Gangurde

Dasara Melava 2023:

ठाकरे गटाचा दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर सुरु असलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ' २०२४ मध्ये भाजपचा माज उतरणार, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यावर टीका केली.

या मेळाव्यात संजय राऊत म्हणाले, 'हा विराट मेळावा सांगतोय की, अब की बार ठाकरे सरकार. एकच शिवतीर्थावर मेळावा. बाकी दुसऱ्या मेळाव्याकडे महाराष्ट्र ढुंकूनही पाहत नाही. मी १०० दिवस तुरुंगात राहिलो, पण बाळासाहेबांचा शिवसैनिक मोडला नाही आणि वाकला नाही. तुमच्या तुरुंगाला आम्ही घाबरत नाही. मोदी आणि भ्रष्टाचार. भाजप म्हणजे भ्रष्टाचार... ५ ही राज्यात भाजपचा दारुण पराभव होतोय'.

'छत्तीसगडमध्ये अमित शहा बोलताहेत की, भ्रष्टाचारांना उलट लटकवायचं म्हणतात मग महाराष्ट्रात काय करताय?. 40 आमदारांना उलट लटकावा, आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू, असे राऊत म्हणाले.

'दाऊद आणि भाजप भाई-भाई बनले आहेत. एकनाथ शिंदे हेच एक मोठा घोटाळा आहे. उदय सामंत यांचा 100 कोटींचा डांबर घोटाळा समोर आला आहे. भाजप सरकार वाघ नखांचा घोटाळा करत आहे. ४० भ्रष्टाचारी आमदारांना उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Saturday Remedies: शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी करा 'हे' ३ सोपे उपाय; घरातील कटकटी होतील कायमच्या दूर!

Rajdhani Express Accident : राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, इंजिन अन् ५ डब्बे रूळावरून घसरले

Mumbai Crime: मुंबई हादरली! कोल्डड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं, अल्पवयीन मुलींवर बलात्कार; अश्लिल व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल

Kitchen Hacks : सोफा कुशनवर डाग लागल्यास काय करावे? जाणून घ्या योग्य टिप्स

SCROLL FOR NEXT