Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Saam tv
मुंबई/पुणे

Mahavikas Aghadi : पुण्यात महाविकास आघाडीत धुसफूस; ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेस अडचणीत

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Mahavikas Aghadi News :

पुणे लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतही धुसफूस पाहायला मिळत आहे. पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीत आगामी निवडणुकीत कसबा विधानसभेची जागा सोडा, तरच लोकसभेला काम करू, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला. ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेणे सुरु केलं आहे.

लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीची बैठक

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात रविंद्र धंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवनात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीतून महाविकास आघाडीतील धुसपूस समोर आली आहे. पुण्यात या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.

पुण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी काय?

पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाने कसबा विधानसभा शिवसेनेला सोडतो,याची हमी द्या, अशी मागणी केली. कसबा विधानसभेबाबत हमी दिल्यानंतरच लोकसभेला काम करू, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे.

या बैठकीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महत्वाचं म्हणजे या बैठकीत कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेसची अडचण निर्माण झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते, हे आता पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Election: निवडणूक तोंडावर,ठाकरेंचा शिलेदार तडीपार; सुधाकर बडगुजरांना तडीपारीची नोटीस

Maharashtra Election: महायुतीत दादाविरुद्ध दादा संघर्ष कायम; चंद्रकांत पाटलांकडून पवारांना संपवण्याची भाषा

Maharashtra Politics 2024 : कोल्हापूरच्या विजयासाठी लाखांच्या पैजा; वाढलेल्या टक्क्यानं वाढवली उत्सुकता

PBKS vs RCB: 'विराट' वादळानं RCB चा विजयी चौकार; पंजाब प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; या संघांचं टेन्शन वाढलं

Tourist Plan: वा भारीच! फक्त 10,000 रुपयांमध्ये जा हनिमूनला

SCROLL FOR NEXT