Anil Parab Latest News: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह शिवसैनिकांवर पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. आता अनिल परब यांच्यासह इतर सहा जणांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदळे यांच्यासमोर ३० जून रोजी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे अनिल परब (Anil Parab) यांना दिलासा मिळणार की त्यांचा अर्ज फेटाळून लावणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या वांद्रे पूर्व परिसरातील शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून त्या शाखेच्या बांधकामावर जेसीबी चालवून कारवाई करण्यात आली होती.
शाखेवर कारवाई करताना त्या शाखेतला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवरायांचा फोटो न काढता हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) नेत्यांनी केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मुंबई महापालिकेच्या कार्यालयात जाऊन शाखा पाडण्याच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्याला या प्रकरणात जाब विचारण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्याने वाकोला पोलिसांकडे (Police) याची रितसर तक्रार दाखल केली. त्याआधारे परब यांच्यासह संतोष कदम, सदा परब, उदय दळवी आणि हाजी अलीम खान यांच्यासह अन्य सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
यानंतर पोलिसांनी वाकोला माजी नगरसेवक हाजी अलीम शेख, विधानसभा संघटक माजी नगरसेवक सदा परब, उदय दळवी, संतोष कदम या चार जणांना मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परब यांच्यासह अन्य सहा आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.