Uddhav Thackeray press Conference Video SAAM TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Video : ना ना करते प्यार... लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Nandkumar Joshi

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानभवनाच्या लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'ना ना करते प्यार, तुमसें कर बैठे' असं काही नाही, असं ठाकरे म्हणाले.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकारण ढवळून काढणारी अनपेक्षित घटना घडली. विधानभवन परिसराच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यांच्यात काही वेळ संवादही झाला. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप आणि ठाकरे गटात पुन्हा जवळीक वाढली की काय अशी चर्चा रंगू लागली.

त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना चॉकलेट दिलं होतं. त्यांच्यातही काही मिनिटे संवाद झाला. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं. त्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह शिवसेना ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. ही भेट निव्वळ योगायोग होती, असं स्पष्टीकरण देण्यात आलं.

लिफ्टला कान नसतात

उद्धव ठाकरे यांनी आज, गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून शिवसेना ठाकरे गटाची काय भूमिका असेल, याबाबत माहिती दिली. शेतकरी कर्जमाफी हा प्रमुख मुद्दा असेल, असे त्यांच्या माहितीवरून स्पष्ट झालं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीवरही कोटी केली.

देवेंद्र फडणवीस आणि मी लिफ्टने एकत्र प्रवास केला. तिथे कुणीही नव्हतं. ते एक गाणं आहे, 'ना ना करते प्यार' याचा नाना पटोलेंशी काही संबंध नाही, अशी कोटी केली. तर ना ना करते प्यार, तुमसें कर बैठे असं आमच्यात काही नाही. ती योगायोगानं झालेली भेट होती. भिंतीला कान असतात असं म्हणतात. पण लिफ्टला कान नसतात. आता गुप्त भेटीसाठी लिफ्ट हे चांगलं ठिकाण आहे, अशी मिश्किल प्रतिक्रियाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT