Udddhav Balasaheb Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: ECI ने शिवसनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शिवसैनिक भारावले...

Uddhav Thackeray Latest News : याबाबत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिय उमटत आहेत. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष वाढला असल्याचं दिसत आहे. धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगान गोठवल्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Latest News)

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काल, शनिवारी निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाऐवजी निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेले चिन्ह निवडण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यात ते शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोला त्यांनी 'जिंकून दाखवणारच' असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली शस्त्र खाल टाकली नसल्याचं स्पष्ट होतं. या पोस्टनंतर शिवसैनिकही भावूक झाले आहेत. अनेक शिवसैनिकांनी "साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत" अशी कमेंट करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे.

आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

दरम्यान शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की, खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते, अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे.

उद्यापर्यंत निर्णय घेण्याचे आदेश

केंद्रीय निवडणुक आयोगाने अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणुक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना उद्या, म्हणजे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत आपापलं चिन्ह निवडण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

SCROLL FOR NEXT