sharad Pawar News Saam tv
मुंबई/पुणे

Maharashra Politics : शिंदेंचा सत्कार, मविआत हाहाकार; शरद पवारांवर ठाकरे नाराज, वाचा सविस्तर

Maharashtra Politics : दिल्लीत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली.. ठाकरे गटाने थेट पवारांवर टीकास्त्र सोडलंय.. शिंदेंच्या सत्काराने नेमकं कसं राजकारण तापलंय? पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत का? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

दिल्लीतील कार्यक्रमात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतूक केलं ाणि साहजिकच त्याचे तीव्र राजकीय पडसादही उमटले...एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं, असं पवार म्हणाले आणि ठाकरे गट अस्वस्थ झाला...

जाहीर कार्यक्रमात थेट शिंदेंचं कौतूक केल्याने ठाकरे गटाने थेट शरद पवारांवर निशाणा साधलाय... शिंदेंचा सत्कार म्हणजे शाहांचा सत्कार असल्याची टीका राऊतांनी केलीय... तर ठाकरेंनी अजितदादांचा सत्कार केला त्यावेळी आम्ही आक्षेप घेतला का? असा सवाल करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पलटवार केला. शरद पवारांकडून शिंदेंचा सत्कार म्हणजे अमित शाहांचा सत्कार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

पवारांवर ठाकरे नाराज

ठाकरेंकडून दादांचा सत्कार, त्यावर आम्ही आक्षेप घेतला का? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला. संजय राऊतांच्या पवारांवरील टीकेनंतर शिंदे गट आणि भाजपला आयतं कोलित मिळालंय...पवारांची भूमिका पटत नसेल तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी, असं थेट आव्हानच शिंदे गटाने दिलं. शरद पवारांची भूमिका पटत नसेल तर उबाठाने मविआ सोडावी, असे मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.

केंद्रातलं एनडीए सरकार नितीश कुमार, चंद्रबाबू, एकनाथ शिंदे यांच्या कुबड्यावर आहे... मात्र तरीही राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपकडून शिंदेंवर कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे शिंदे नाराज आहेत.. तर दुसरीकडे ठाकरेंकडून स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीत दबावाचं राजकारण केलं जातंय.. नेमकं हेच हेरुन पवारांनी दिल्लीत शिंदेंचा सत्कार केलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.. याबरोबरच पवार शिंदेंची ही कृती सुसंस्कृत राजकारणाचं कारण आहे की दबावाचं राजकारण? याकडे देशाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठवाड्यात ओबीसी प्रमाणपत्रांची मागणी; ओबीसी नेते आक्रमक

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा नवा जीआर काढणार? मसुद्याला अंतिम रूप देण्याच्या हालचाली

IBPS RRB Vacancy: सरकारी नोकरीची संधी! बँकेत लिपिक ते PO च्या १३,२१७ पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

TET Exam : टीईटी गैरप्रकाराचा धसका; आता शिक्षकांची चारित्र्य पडताळणी होणार, VIDEO

SCROLL FOR NEXT