Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena-Sambhaji Brigade : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका; म्हणाले, बरं झालं ते गेले, माझाही...

संविधान वाचविण्यासाठी व प्रादेशिक अस्मिता वाचविण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई: 'बरं झालं ते दूर गेले, माझाही असंगाशी संग गेला, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली. आज शिवसेना (ShivSena) आणि संभाजी ब्रिगेड एकत्रीत काम करणार आहेत. हे सांगण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) सौरभ खेडेकर, सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती.

या पत्रकार परिषदेत बोलतना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपसह एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'या लढवया सहकाऱ्यांचे स्वागत करतोय, प्रादेशिक पक्ष संपवण्यालाच लोकशाही माननारे बेताल वागू लागले आहेत. सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) निकाल बेबंदशाही की लोकशाही हे ठरवणारा आहे.

पाहा व्हिडीओ -

संविधान वाचविण्यासाठी व प्रादेशिक अस्मिता वाचविण्यासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. आपण सर्वजण शिवप्रेमी आहोत, एकत्र आल्यावर एक इतिहास होणार आहे. आपल्याला दुहीचा शाप असून आजपर्यंत ही दुही आपल्याला गाडत होती, पण आता आपण दुहीच्या शापाला गाडून टाकूया असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच पुरोगामी हा शब्द जरा अवगड आहे, तुम्हाला सेनेची रोखठोक भूमिका पटली म्हणून तुम्ही आलात म्हणून मला आनंद आहे. सत्ता पुढे येणारच आहे, काही नसताना तुम्हीसोबत आला आहात. ही वैचारीक लढाई आहे, निवडणुकीसाठीची युती नाहीये.

आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण बिघडवलं जात आहे, बोलतना सोप्प आहे की, 'हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, जिजाऊ माँ साहेबांचा आहे.' पण तसं वागायचं नाही अशी वृत्ती भाजप आणि शिंदे गटाची आहे.

मात्र, महाराष्ट्राचं जे खरं रुप आहे ते रुप घडविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत (BJP) युती केली होती. संघाची विचारधारा घेऊन ते जातायत का? ते मोहन भागवतांच्या विचारावर जातायत का असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच विचार मजबूत करायचा असेल तर एकत्रीत लढू असंही.

या पत्रकार परिषदेदरम्यान, 'मुख्यमंत्र्यांना आपण कंत्राटी मुख्यमंत्री म्हटला, याबाबत विचारलं असता ते म्हणाले, 'मुख्यमंत्री कोणी असला तरी त्यांची यंत्रणा चांगली पाहिजे, मी त्यांना काही बोललो नव्हतो, मी म्हटलं होतं की, मागे केंद्र सरकारने सर्व भरती कंत्राटी पद्धतीने करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने पीएम, सीएम यांची देखील कंत्राटी पद्धतीनेच भरती करायला काय हरकत आहे असं मी म्हणालो असल्याचं त्यांनी सांगितलं.

तर ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन, असंगाशी संग असण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असलेलं बरं असं काल मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचं जाऊद्या काही विचारु नका, शिवाय बरं झालं ते गेले, कारण माझा असंगाशी संग गेला असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT