Uddhav thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Dasara Melava 2023: खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यातून शिंदे गटावर बाण

खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर दसरा मेळाव्यातून बाण

Vishal Gangurde

Dasara Melava 2023: शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवर सुरु आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली. संपूर्ण राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'खोक्याची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो... ५७ वर्षे झाली. पण आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांना मोडीत काढून परंपरा चालू ठेवली आहे. पुढची अनेक वर्षे सुरूच ठेवणार आहोत. सर्वप्रथम दसऱ्याच्या शुभेच्छा. हा मेळावा या संस्कृतीचं विराट दर्शन आहे. आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला. रावण सुद्धा शिवभक्त होता. पण तो शिवभक्त असूनही रामाला त्याचा वध करावा लागला. कारण रावण माजला होता'. सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

'आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. प्रभू श्रीरामचंद्रांनी धनुष्यबाणाने रावणाचा वध केला होता. तो धनुष्यबाणही यांनी चोरला आहे. ज्या प्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका पेटवली होती. तशीच तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी इथं शिवसैनिक जमला आहे. सध्या क्रिकेटचा मौसम आहे. वर्ल्डकप सुरू आहे. मधेमधे जाहिराती असतात. काही जाहिराती पाठ होतात. एक जाहिरातीत अक्षय, अजय देवगण, शाहरूख खान आहेत, आमच्याकडेही तिघे आहेत. त्यांना 'कमला' पसंत आहे, यांना 'कमळा' पसंत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला.

'जरांगे पाटलांना धन्यवाद देतो. त्यांनी धनगरांना साद घातलीय ही चांगली गोष्ट केली. ज्यावेळी जालन्यात शांततेत आंदोलन सुरू होतं, हे आताचं सरकार हे डायरचं सरकार आहे. आंतरवालीमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार केला होता, असेही ते म्हणाले.

'जालन्याचा डायर कोण आहे, कोणी आदेश दिला, काही चौकशी नाही. जरांगेंना मी भेटलो. त्यांनी मला गोळीची पुंगी दाखवली. गद्दारांना म्हणा तुमच्यात हिंमत असेल तर हा प्रश्न सोडवून दाखवा. मराठा समाजाला न्याय द्या. न्याय मिळवायचा असेल तर, इथे सुटणारा नाही. हा लोकसभेत सोडवावा लागेल, असे ठाकरे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Shocking : महाराष्ट्र हादरला! मुलाने केली वडिलांची हत्या, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT