Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray In Mumbra : हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेवा आणि..' उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला खुलं आव्हान

Uddhav Thackeray : मुंब्य्रात पाडलेल्या शाखेच्या पाहणीसाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलं आहे.

Bharat Jadhav

Uddhav Thackeray In Mumbra :

सरकारला सत्तेचा माज आला आहे. त्यांचा हा माज निवडणुकीत उतरवू. सत्तेचा माज आलेल्यांवर बुलडोझर फिरवणार आहोत. खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केलं. पण तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो या असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं. (Latest News)

मुंब्र्यात असलेली शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक खूप आक्रमक झाले आहेत. तर ही शाखा शिंदे गटाची होती, असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. शाखा पाडल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंब्र्यात आलेत. ते शाखेची पाहणी करणार होते, परंतु पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अखेर लांबूनच शाखेची पाहणी करुन उद्धव ठाकरेंना परत फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत त्यांना खुल आव्हान दिलं आहे. पुढच्या निवडणुकीत गद्दार लोकांचं डिपॉझिट करायला भाग पाडू असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

मुंब्र्यात पाडलेल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेले. उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. तसेच संबंधित शाखेच्या परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्तेदेखील जमलेले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला.

उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना प्रचंड विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर लांबूनच शाखेची पाहणी करुन उद्धव ठाकरेंना परत फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

Pivali Sadi Song: संसाराच्या गाड्यातून वैयक्तिक आयुष्याला सांभाळणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी; 'पिवळी साडी' गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ

Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

SCROLL FOR NEXT