Deepak Kesarkar : खासदारकीच्या निवडणुकीवर केसरकरांचं मोठं विधान; स्वत: च्याच विधानाने सुरू झाली होती चर्चा, आता स्वत:च टाकला पडदा

Deepak Kesarkar : आपण आमदारकीसाठी उभा राहणार असल्याच ठामपणे सांगत केसरकरांनी भाजपच्या राजन तेली यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar Saam Tv
Published On

(विनायक वंजारे )

Deepak Kesarkar On Loksabha Election :

शिवसेना नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा स्वतः केसरकर यांच्या विधानामुळे सुरू झाली होती, आता त्यांनीच या चर्चेवर पडदा टाकला. मी विधानसभेचीच निवडणूक लढवणार आहे. मला खासदारकीची निवडणूक लढविण्याची अजिबात इच्छा नसल्याचं दीपक केसरकर म्हणालेत. (Latest News)

सावंतवाडी येथे त्यांनी पत्रकार परिषदेत आपण आमदारकीसाठी उभा राहणार असल्याचं ठामपणे सांगत त्यांनी भाजपच्या राजन तेली यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार आणि अमित शाह भेटीवर आपलं मत मांडलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा खोटा प्रचार केला जातोय. परंतु ते सावंतवाडीत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या या विधानामुळे शालेय शिक्षणमंत्री केसरकरांनी लोकसभेच्या निवडणुकीवरील चर्चेवर पडदा टाकला. दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गमधून केसरकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राज्यात आणि स्थानिक पातळीवर सुरू होती.

विनायक राऊताच्या विरुद्धात लढायची होती निवडणूक

वर्षभरावर लोकसभा निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पक्ष कामाला लागलेत. महाराष्ट्रात अनेकजण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी दीपक केसरकरांनी लोकसभेच्या निवडणुकीवर विधान केलं होतं. पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करू, असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं होतं. महाभारताचं उदाहरण देत त्यांनी राऊतांना पराभूत करण्याचा निश्चय केला होता.

मतदारसंघासाठी भाजपच्या चिन्ह घेण्यास तयार

रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. मागे एकदा तेथील स्थानिक पातळीवर या मतदारसंघासाठी राजकारण तापलं होतं. यादरम्यान केसकर यांनी या मतदारसंघासाठी आपण भाजपच्या चिन्हावर देखील निवडणूक लढवू, असं म्हटलं होतं. पालघरमध्ये भाजपचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत असेल तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात आमच्यातील एकाने भाजप चिन्हावर निवडणूक लढवली तर बिघडले कुठे, असं ते म्हणाले होते.

भेट घेणं चांगल्यापणाचं लक्षण

अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या भेटीमागचा काय अर्थ असू शकतो, असा प्रश्न केसरकरांना केला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलयं. त्यांचे स्वतःचे काही प्रश्न असतात ते मांडण्यासाठी अजित पवार आणि त्यांचे नेते दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेण्यासाठी जात असतात. पुढे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची रणनीती सुद्धा ठरवायची आहे. त्यामुळे अशा गाठीभेटी होणं स्वभाविक असतं. ते चांगल्यापणाचे लक्षण आहे, अशा शब्दात केसरकर यांनी अजित पवार आणि अमित शहा भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.

Deepak Kesarkar
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपसोबत जाणार; आमदार रवी राणांचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com