pune news  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील राजकारण फिरणार; भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब', पत्रात नेमकं कुणाचं नाव?

pune politics news : पुण्यातील राजकारण फिरण्याची शक्यता आहे. ठाकरे गट भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब' टाकणार आहे. पत्रात नेमकं कुणाचं नाव आहे, जाणून घेऊयात.

Akshay Badve

वसंत मोरे लवकरच पुणे शहरातील भाजपच्या कामकाजावर आरोप करणारा लेटर बॉम्ब जाहीर करणार

वसंत मोरे आणि इतर नेत्यानी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

भाजपने गेल्या अनेक वर्षांत विकासकामे केली नसल्याचा मोरेंचा आरोप

पुणे महापालिका निवडणुकीत मोरे आणि त्यांचा पुत्र निवडणुकीच्या मैदानात होणार

ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्याकडून लवकरच लेटर बॉम्ब पडणार आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांची ठाकरेंची घेऊन भाजपविरोधात लेटर बॉम्ब टाकणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी वसंत मोरे यांच्यासह ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रमुखांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पुणे शहरातील विविध विषयांबाबत वसंत मोरे लवकरच 'लेटर बॉम्ब' समोर आणणार आहे.

वसंत मोरे हे ठाकरे गटाचे पुणे शहराचे निवडणूक समन्वयक आहेत. त्यांनी २ दिवसांपूर्वी शहर प्रमुखांसह मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काही विषय उद्धव ठाकरेंना दिले. माझं त्यावर काम सुरू असून त्याबद्दल मला काही सूचना ठाकरे साहेब दिल्या आहेत. ते झालं की मी लवकरच लेटर बॉम्ब टाकणार असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरात भाजपने विकासाच्या नावाखाली कुठलेही कामं केलेली नाहीत. याबाबत एक सविस्तर बाब या "लेटर बॉम्ब" मधून समोर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वसंत मोरे यांच्याकडे पुणे शहराच्या निवडणूक समन्वयकाची जबाबदारी आहे. शिवाय येत्या महापालिका निवडणुकीत वसंत मोरे हे त्यांचे पुत्र प्रतीक मोरे यांना घेऊनही मैदानात उतरणार आहेत.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक वसंत मोरे कोणत्या मुद्द्यावर लेटर बॉम्ब टाकणार आहेत?

वसंत मोरे हे पुणे शहरातील अनेक विकासकामांबाबत भाजपने केलेल्या कामाबाबत लेटर बॉम्ब टाकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत फोडाफोडी बंद, पण 'ठणाठणी' सुरूच; कल्याण-डोंबिवलीतलं राजकारण पुन्हा तापलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात

Makeup Side Effect: रोज हेवी मेकअप केल्याने होऊ शकतो 'हा' त्रास; करा आजच तुमच्या रुटीनमध्ये बदल

Chana Bhel Recipe: चटापटीत चणा भेळ कशी बनवायची?

Genelia Deshmukh: मिसेस देशमुखांचा रुबाबदार लूक; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

SCROLL FOR NEXT