Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Uddhav Thackeray on Chief minister Face : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी विविध विषयावर मोठं भाष्य केलं.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीनेही आगामी निवडणुकीसाठी एकत्र पाऊल टाकलं आहे. लोकसभा निकालानंतर पहिल्यांदा एकत्र घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले. यावेळी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार,यावरही उद्धव ठाकरेंनी मोठं भाष्य केलं.

लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्यांदा एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले. ठाकरेंनी यावेळी महायुतीवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी विरोधकांच्या विविध आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिदाचा कोण असेल, यावर उत्तर देताना महायुतीला लक्ष्य केलं. मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा कोण? यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, महायुतीचा चेहरा कोण आहे? तिन्हीच्या तिन्ही गाव ओसाड आहेत.कांद्यामुळे भाजप रडला. त्यांनी जे सोबत घेतले, तेही त्यांच्यामुळे रडले'.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करतान ठाकरेंनी म्हटलं की,'नाना पटोले यांचा विषय संपला आहे. आम्ही जागा मागे घेतली आहे. या निवडणुकीत मोठा भाऊ छोटा भाऊ चालणार नाही. सगळ्यात चांगला उमेदवार हा कोणत्या ठिकाणी कोणाचा आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घेऊ'

उद्धव ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार

मतदारांचे आभार मानताना ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. यूट्युबबर आणि संघटनांनी सुद्धा विचार मांडले. ही लढाई संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी होती. आता दोन- तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

Maharashtra Live News Update: मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर खुनी हल्ला

Morning Yoga Poses: दररोज सकाळी फक्त १५ मिनिटे करा योगा, संपूर्ण दिवसभर राहाल फ्रेश

SCROLL FOR NEXT