Uddhav Thackeray Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंकडून पक्ष विस्ताराला सुरुवात; ६ बड्या नेत्यांकडे सोपवली महत्वाची जबाबदारी

Satish Daud

Shivsena Uddhav Thackeray News

शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीत ६ नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नव्या कार्यकारिणी विस्तारात खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी, यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) सांगण्यात आले आहे. दरम्यान, कार्यकारिणी विस्तारात पक्षाचे उपनेते आणि संघटक पदीसुद्धा नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

उपनेते म्हणून विजय साळवी (कल्याण), संजय जाधव परभणी, संजय पवार (कोल्हापूर), राजुल पटेल (मुंबई), शीतल देवरू (मुंबई), शरद कोळी (सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव म्हणून सरदेसाई साईनाथ दुर्गे आणि सुप्रभदा फातर्पेकर काम पाहणार आहे.

तर संघटक म्हणून अस्मिता गायकवाड (सोलापूर) शुभांगी पाटील (नाशिक) जान्हवी सावंत (कोकण) छाया शिंदे (सातारा), विलास वाव्हळ (मुंबई), विलास रुपवते(मुंबई), चेतन कांबळे (संभाजीनगर ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या नियुक्तीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतेमंडळीमध्ये एकूण १६ जणांचा समावेश असणार आहे.

यामध्ये मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांचा समावेश असेल, असंही ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT