Uddhav Thackeray, Narendra Modi
Uddhav Thackeray, Narendra Modi -Saam TV
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Press Conference : 'देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा'; उद्धव ठाकरेंचे थेट PM नरेंद्र मोदींना आवाहन

Vishal Gangurde

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News: सुप्रीम कोर्टाने काल सत्तासंघर्षावर आपला निर्णय जाहीर केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात नंगानाच सुरू, त्याला चाप लावा, आवाहन केलं आहे. (Latest Marathi News)

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रामध्ये बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावर न्यायालयाने मत मांडलं. शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून आपल्याला दावणीला बांधण्याचा भाजपचा घाट उघडा पडला. बेसूर चेहरा काल उघडा पडला'.

'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काहींनी फटाके वाजवले. भाजपने फटाके वाजवले समजू शकतो. गद्दारांनी फटाके का वाजवले कळत नाही? सर्वोच्च न्यायालयाने पोपट ठेवला आहे, तो मेलेला आहे. विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आता निर्णय आहे. महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

'न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवल आहे की उद्या ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केल असतं. म्हणजे हे सर्व बेकायदेशीर आहे. मी राजीनामा दिला ते योग्य केलं. मेलेला पोपट हातात घेऊन मिठू-मिठू काहीजण करत आहे. महाराष्ट्राची ही अवहेलना थांबली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

'पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, आपले मतभेद असतील पण आपल्याला देशात नंगानाच सुरु आहे त्याला चाप लावा. मोदीजी यामुळे आपली बदनामी होत आहे. तुम्ही त्याला चाप लावा, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून आजारी पत्नीला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी

Rohit Sharma On Captaincy: अखेर मौन सोडलं! कर्णधारपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितचं रोखठोक उत्तर

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

Nashik Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी; पक्षातील बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात, अपक्ष उमेदवारी अर्ज भरला

Heena Gavit : खोटे बोलून आदिवासी समाजाची दिशाभूल; डॉ. हिना गावित यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT