Uddhav Thackeray Dasara Melava 2024 Speech Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Speech: छत्रपती शिवरायांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी दिलं वचन

Uddhav Thackeray Dasara Melava 2024 Speech: आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमचं सरकार आपल्यावर छत्रपती शिवरायांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारणार, अशी घोषणा केली.

Satish Kengar

आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायाचं मंदीर बांधणार, अशी घोषणा आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांनी आज केली. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''प्रभूरामाबरोबर वानर होते. त्यांना आम्ही देव मानतोच. शिवरायांनी महाराष्ट्रावर आलेले दैत्य मारले. ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला.. म्हणजे मते मिळवली. पण पुतळ्यामध्येही त्यांनी पैसे खाल्ले... आठ महिन्यात पुतळा कोसळला. महाराजांचे पुतळा नुसते उभारत नाही, त्याची पूजा करतो. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायाचं मंदीर बांधणार. आमच्या देवाऱ्यातही शिवरायांची पूजा होती. देशातील प्रत्येक राज्यात मंदिर झालं पाहिजे. मंदिरात त्यांचे सर्व शौर्य दाखवले पाहिजे.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेत ते म्हणाले, ''मोदीजी आणि शिंदे सरकार शिवाजी महाराज म्हणजे मते मिळवण्याचं यंत्र नाही. इव्हीएमसारखा त्याचा वापर करु नका. तुम्हाला माझ्यावर किती टीका करायची ती करा.. महाराजांच्या मंदिराला जो विरोध करेल, त्याला महाराष्ट्र बघून घेईल. आपलं दैवत कधी पुजायचे.. मोदींची मंदिरे उभारयाची का?''

'गद्दारी करुन तुम्ही मला खाली खेचलं'

उद्धव ठाकरे म्हणाले की, ''देशांनी तिसऱ्यांदा सत्ता देऊनही हिंदू धोक्यात आहेत आहे. मग काँग्रेस बरी नाही. त्यावेळी तुम्ही म्हणायचात मुस्लीम धोक्यात आहेत.'' ते म्हणाले, ''गद्दारी करुन तुम्ही मला खाली खेचलं. ते तुम्हाला दिसले नाही का? गद्दारी करुन आमचं सरकार शकुनी मामा राज्य करतेय. १०० वर्षे झाली, आरएसएसने चिंतन शिबिर घ्यावे. आताची भाजप तुम्हाला मंजूर आहे का.. आम्हाला मंजूर नाही. पूर्वीचा भाजपमध्ये पावित्र होतं. पण आताचा भाजप हायब्रिड झालं आहे.''

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, '''तुम्ही देशाची विल्हेवाट लावती. हिंदू मुस्लीम वाद लावला. हिंदूमध्ये वाद लावला. महाराष्ट्रात मराठी, अमराठी वाद.. जाती-पातीमध्ये वाद लावता. तुमच्यात धमक असेल तर आतापर्यंत आरक्षण देऊन टाकायचं होतं. ९५ मध्ये वाजपेयी यांनी सोलापूरमध्ये जाहीर सभेत धनगरांना आरक्षण देऊ, असे वचन दिले होते. मराठा लढतोय. ओबीसी भयभीत झाला आहे. जातीपातीत तुम्ही का वाद लावताय?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT