संत वचन, शेरोशायरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं; मुख्यमंत्र्यांचा टोला Saam TV
मुंबई/पुणे

संत वचन, शेरोशायरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं; मुख्यमंत्र्यांचा टोला

राज्याच्या विधानभवनात (legislative) 'राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदार संघाच्या संदर्भात...' दोन दिवसीय कार्यशाळेत मुख्यमंत्री (Uddhav Thackaray) बोलत होते.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्याच्या विधानभवनात (legislative) 'राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदार संघाच्या संदर्भात...' दोन दिवसीय कार्यशाळेत मुख्यमंत्री (Uddhav Thackaray) बोलत होते. ५, ६ ऑक्टोबर ला ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत राज्यभरातील सर्व आमदार उपस्थीत आहेत. या कार्यशाळेला संबोधीत करताना उद्धव ठाकरे म्हणाले, काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला आहे. आपण विद्यार्थीच आहोत आणि त्याचबरोबर सभापती आणि उपसभापती मास्तर आहेत. हे राज्यचं माझा मतदार संघ आहे, कारण मी विधान परिषदेचा आमदार आहे. असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. क्षेत्राचा विचार न करता सरकार टिकावं म्हणून एखाद्याला मंत्रिपद नाहीतर सन्मानाचं पद दिले जाते. राज्याचा अर्थसंकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्रा म्हणाले ''अर्थसंकल्प म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे, सगळे ठिपके जोडून रांगोळी भरली जाते आणि ठिपके जोडायच काम हे लोकप्रतिनिधींनी करायचं असतं''.

प्रत्येक विषयावर बैठका झाल्या पाहिजे. अर्थसंकल्पाबाबत बोलताना संत वचन, शेरोशयरी, कवीता आल्याच पाहिजे का? अर्थसंकल्प समजून तो मांडणं महत्त्वाचे असते. अभ्यास करुन योजना खासगी करावी, बजेट कसे ठेवावे हे महत्वाचे असते असं मत मुख्यमंत्र्यांनी बोलताना व्यक्त केलं आहे. मला काही सभागृहाचा अनुभव नव्हता. विधानभवनाच्या सभागृहाबाबत बोलताना ते म्हणाले मला सत्तारूढ आणि विरोधी पक्ष असे दोन गट कळले, लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या अपेक्षा असतात लक्ष असत शेरोशयरी करायची आणि नेमकं विरोधी वागायचं असं अयोग्य नाही किती पातळीपर्यंत हमरी तुमरी करायचं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना विचारला आहे.

त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्याचं देखील सांगितले. हा कुस्तीचा आखाडा नाहीय आपल्या राज्याची शोभा आहे, सभागृहात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल असं नाही, विरोधी पक्षाकडून सुचनांची अपेक्षा असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. कोरोना परिस्थीती बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आरोग्य सेवेच्या बाबत जगाच्या तुलनेत महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर तिरसी लाट न येण्यासाठी प्रार्थना देखील केली. कोरोना बरोबरच महाराष्ट्रात चक्रीवादळ, पाऊस असे संकट आले त्याला महाराष्ट्र खंबीरपणे सामोरा गेल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT