भंडारा: सावधान गुन्हेगारांनो! भंडारा जिल्ह्यात येऊन एखादा अपराध करण्याच्या विचार करताय तर खबरदार... आता भंडारा जिल्हा पोलिस दलात डॉबरमॅन जातीचा अद्ययावत प्रशिक्षित कुत्रा "रॉकी" दाखल झाला आहे. त्वरित गुन्हा शोधन पद्धती, जबरदस्त वासाद्वारे शोधन शक्ती आदि वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळे तो गुन्हे अन्वेषणबाबत राज्यात दुसरा आला आहे. (Beware criminals! "Rocky" filed in Bhandara police force)
हे देखील पहा -
17 महीने वयाच्या रॉकी नामक डोबरमान जातीच्या अद्ययावत प्रशिक्षित कुत्र्याला बघताच चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडते. अद्ययावत प्रशिक्षण घेऊन हा रॉकी नुकताच भंडारा जिल्हा पोलिस दलात दाखिल झाला आहे. 9 महीने भंडारा येथील प्रशिक्षण व सीआयडी पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण करून पुणे गुन्हा अन्वेषण येथील परीक्षा पास करत रॉकी भंडारा पोलिस दलात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे पुणे येथे झालेल्या गुन्हे अन्वेषण परीक्षेत राज्यातील 20 कुत्र्यांमध्ये रॉकी दूसरा आला आहे. त्वरित गुन्हा शोधन पद्धती, जबरदस्त वासाद्वारे शोधन शक्ती आदि वैशिष्ट्यपूर्ण गुणाने तो भंडारा गुन्हे अन्वेषण विभागात अव्वल ठरला आहे.
रॉकी याने 9 महीने भंडारा येथील प्रशिक्षण व सीआयडी पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता रॉकीचे 6 महिन्यांचे बॉम्ब व नॉरकोटिक्स परीक्षण सुरु आहे. त्यामुळे अश्या अद्ययावत प्रशिक्षणाने रॉकी भंडारा पोलिस दलात असलेल्या 6 कुत्रांपैकी अव्वल ठरला आहे.
भंडारा पोलिस दलातील रॉकीसह इतर 5 गुन्हे अन्वेषण कुत्रे यांची दिनचर्या सकाळी साडे पाच वाजता सुरु होऊन दिवसभरात दीड तासांचे प्रशिक्षण पूर्ण करत जिल्ह्यातील घडलेल्या गुन्हाच्या शोधात जात असते. त्यांच्या जेवणाच्या वेळा व आणि वैद्यकीय तपासणीची निश्चित वेळ ठरली असल्याने त्यांचे आरोग्य देखील सुदृढ राहण्यास मदतशीर ठरत आहे.
विशेष बाब अशी की ह्या गुन्हे अन्वेषण कुत्र्यांनी शेकडो गुन्हे सिद्ध करत गुन्हेगारांना पोलिस कोठडीचे दर्शन करविले आहे. त्यामुळे आजही भंडारा पोलिस दलातील गुन्हे अन्वेषण कुत्र्यांची दहशत गुन्हेगारात पहायला मिळत आहे. यात एक भावनिक बाब अशी 40 ते 45 महिन्याच्यां कुत्र्यांचे पिल्लू ते 10 वर्षांची सेवा या दरम्यानच्या कालावधी यात त्यांचे हॅंडलर प्रशिक्षक यांचे त्यांच्याशी नाते जुडुन जात असते. त्यामुळे 10 वर्षांच्या सेवा समाप्तीचा दिवस हँडलर प्रशिक्षकासाठी भावनिक दिवस असतो.
जिल्ह्यातील 5 प्रशिक्षित कुत्र्यांमध्ये आता रॉकी नावाचा अद्ययावत प्रशिक्षित कुत्र्याचा समावेश झाला. त्याचे सर्व गुण वैशिष्ट्य पाहता गुन्हेगारात दहशत निर्माण झाली तर यात नवल वाटायला नको.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.