Baramati-Bhigwan Road Accident  Baramati-Bhigwan Road Accident
मुंबई/पुणे

Accident : भल्या पहाटे बारामतीजवळ भीषण अपघात, दोन शिकाऊ पायलटचा जागीच मृत्यू

Two Trainee Pilots Dead : इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडी जवळ भल्या पहाटे भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये दोन शिकाऊ वैमानिक पायलटचा जागीच मृत्यू झालाय.

Namdeo Kumbhar

Pune baramati car accident news : बारामती : इंदापूर तालुक्यातील लांमजेवाडी जवळ भल्या पहाटे भीषण अपघात झालाय. पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ वैमानिक पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. यात दोन शिकाऊ वैमानिक पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.

दशु शर्मा वय वर्ष 21, आणि आदित्य कणसे वय वर्ष 29 अशी मृतांची नांवे आहेत. तर कृष्णा मंगलसिंग वय वर्ष 21 व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय वर्ष 21 वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

बारामती भिगवण मार्गावर लामजेवाडी गावाजवळ सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात जाला. टाटा हॅरिअर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. वाहनातील हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते. यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक तर राजस्थानच्या एका युवतीचाही समावेश आहे. यातील गंभीर दोन जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT