Kalyan News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: हातावर फटका द्यायचे अन् मोबाईल घेवून पळायचे... ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या 'फटका गँग'चे दोन चोरटे गजाआड; ३ जण पसार

Kalyan News Update: या तरुणांना ताब्यात घेतले मात्र याच दरम्यान अंधाराचा फायदा घेत त्यांचे तीन साथीदार पसार झाले.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...

Kalyan Crime: लोकल, मेल, एक्सप्रेसट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल पळविणाऱ्या फटका गँगच्या दोन सराईत चोरट्यांना सापळा रचत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत टोळीतील तीन जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. मोहम्मद अब्बास समीर सय्यद, मोहम्मद अली हुमायून जाफरी अशी या चोरट्यांची नावे असून हे दोघे आंबिवली इराणी वस्तीत राहणारे असून सराईत गुन्हेगार आहेत. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन कल्याण रेल्वे स्टेशन ते टिटवाळा रेल्वे स्टेशन दरम्यान लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हातावर फटका मारुन मोबाईल चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे, आरपीएफ सी आय बीचे निरीक्षक सुनील शर्मा यांच्या सह आरपीएफ व जिआरपी यांची 25 पोलीसांचे पथक तयार केले होते.

चोरट्यांची माहिती काढत अंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात चार दिवसापासून सापळा रचला. याच दरम्यान अंबिवली रेल्वेस्टेशन जवळ ट्रॅक लगत पाच तरुण संशयित रित्या फिरताना दिसून आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले मात्र याच दरम्यान अंधाराचा फायदा घेत त्यांचे तीन साथीदार पसार झाले.

मोहम्मद अब्बास समीर सय्यद, मोहम्मद अली हुमायून जाफरी अशी दोन चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे. या टोळीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करत आहेत तर पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sev puri chutney recipe: शेवपुरीसाठी स्ट्रीट स्टाईल चटपटीत तिखट चटणी कशी तयार कराल?

भाजपच्या मोर्चात गिरीश महाजनांवर भडकलेल्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

महिला भक्तावर बलात्कार, पश्चिम महाराष्ट्रातून भोंदू भोसले महाराजाला बेड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाव रील खंडाळा खातात ट्रॅफिक जाम..

Nashik Tourism : धुक्याची चादर, उंच डोंगर अन् निसर्ग शांतता; उन्हाळ्यात फिरा सह्याद्रीच्या कुशीत वसलेले 'हे' थंडगार ठिकाण

SCROLL FOR NEXT