uddhav thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : ठाकरे गटाच्या बैठकीदरम्यान गोंधळ; दोन पदाधिकाऱ्यांकडून बड्या नेत्यावर मारहाणीचा आरोप, पक्षात खळबळ

uddhav thackeray News : ठाकरे गटाच्या बैठकीदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली. दोन पदाधिकाऱ्यांनी थेट बड्या नेत्यावर मारहाणीचा आरोप केला.

Vishal Gangurde

ठाकरे गटाच्या शाखेत बैठकीदरम्यान गोंधळ

दोन पदाधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाणीचे आरोप

पदाधिकाऱ्यांच्या आरोपाने पक्षात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरातील शिवसेना ठाकरे गट शाखेत मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीदरम्यान दोन पदाधिकाऱ्यांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. या आरोपाने पक्षात खळबळ उडाली आहे. शाखाप्रमुख सोमनाथ भोईर आणि देवेंद्र प्रसाद यांनी जिल्हाप्रमुख शरद पाटील व त्यांच्या समर्थकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. मात्र शरद पाटील यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावत केवळ किरकोळ झटापट झाल्याचे सांगितले आहे.

कोळशेवाडी येथील शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेत पक्षाचे सहसंपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीपूर्वीच शाखेत वाद निर्माण झाला.शाखाप्रमुख सोमनाथ भोईर यांनी आरोप केला की, पक्षात पदाधिकाऱ्यांची बैठक होती.. जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि त्यांचे पुतणे धनराज पाटील यांनी बाहेरून 60 ते 70 तरुणांना बोलावले होते. या तरुणांनी शाखेत घुसून त्यांना मारहाण केली तसेच देवेंद्र प्रसाद यांनाही बेदम मारहाण करण्यात आले.

मारहाण करणारे तरुण नशेखोर आहेत, त्यांच्या पक्षाची काही संबंध नाही. या घडलेल्या घटनेनंतर नेत्यांना याची माहिती देण्यात आली आहे. पक्षातील नेते निर्णय घेतील. याबाबत देवेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, ते गेली 20 वर्षे पक्षासाठी काम करत आहेत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे माझ्या पत्नीने काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी ते बैठकीला गेले असता त्यांच्याशी गैरवर्तन करून मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

तत्पूर्वी, जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बैठकीत महापालिका निवडणुकीत पक्षाशी दगाबाजी केल्याच्या मुद्द्यावरून काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यातून थोडीफार झटापट झाली असली तरी कोणालाही मारहाण झालेली नाही. काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या देवेंद्र प्रसाद हे या बैठकीला आले त्यामुळे काही पराभूत उमेदवारांचा रोष बघायला मिळाला असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम दिघे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मी गेली 40 वर्षे पक्षासाठी काम करत आहे. शाखेत अशा प्रकारची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती. जे काही घडले ते अत्यंत निंदनीय आहे. या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून पक्ष नेतृत्व या प्रकरणावर काय भूमिका घेते याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautami Patil : एक लाजरा न्‌ साजरा मुखडा...; गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात सुंदर लूक, फोटो तुम्हीही पाहाल तर...

Maharashtra News Live Update: विमान प्रवासाच्या मनमानी विमान तिकीट दरांना लगाम लागणार

Maharashtra Politics: शिंदेंच्या आमदाराकडून राष्ट्रवादीच्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकारणात खळबळ

Monsoon Update : वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस! १३ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

Kanyapujan Gifts : नवरात्रीत कन्या पूजनाला द्या ६ हटके गिफ्ट्स? मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणणारे बजेटफ्रेंडली वाण

SCROLL FOR NEXT