Pune News: Two Person Stolen 34 Years Old Woman Gold Ornament In Kunjirwadi Pune Saam tv
मुंबई/पुणे

Pune Chain Snatching Video: मुलाला शाळेतून घेऊन आई रस्त्याने घरी निघाली होती, इतक्यात दुचाकीस्वार तिच्याजवळ आले अन्...VIDEO

Pune Crime News in Marathi: पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कुंजीरवाडी येथे ही घटना घडली.

Vishal Gangurde

Pune Crime News:

पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कुंजीरवाडी येथे ही घटना घडली. सोमवारी दुपारी ही घटना घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील कुंजीरवाडी परिसरात मुलाला शाळेतून घरी घेऊन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. महिलेने या दोघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. कुंजीरवाडीतील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोनसाखळी चोरी प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिसांत धाव तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. चोरट्यांनी तब्बल १.३५ लाख रुपयांचे सोन्याची दागिने चोरले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय महिला शाळा सुटल्यानंतर मुलाला घेऊन घरी चालली होती. घराच्या दिशेने जाताना अचानक मारुती मंदिराससोर दुचाकीस्वार तोंडाला बांधून आले. दुचाकीवरील दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या अज्ञात चोरट्यांनी १.५ लाखांची सोनसाखळी चोरली.

कुंजीरवाडी परिसरात घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तसेच चोरटेही या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

SCROLL FOR NEXT