Badlapur Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Crime : वाढदिवसाच्या पार्टीत बोलावलं, मैत्रिणीने दिलं गुंगीचं औषध आणि मित्रांनी केला सामूहिक अत्याचार

Badlapur News: बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीत बोलवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

अजय दुधाणे

बदलापुरात गुन्ह्यांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अलीकडे येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरला हादरवणारी एक घटना समोर आली आहे.

येथे आपल्या मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी येथील परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं.

रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचं भूमिकाने सांगितलं.

यानंतर पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र हा अत्याचार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दरम्यान, याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण भूमिका, साताऱ्याहून आलेला मित्र शिवम (२२) आणि संतोष (४०) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT