Karjat Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Raigad Crime: पोलिस ठाण्यात दोन गट भिडले, पोलिसांसमोरच कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी, पाहा VIDEO

Karjat Crime News: रायगडच्या कर्जतमध्ये पोलिस ठाण्यातच दोन गट आमने-सामने आले. तुफान हाणामारी आणि धारधार शस्त्रांनी एकमेकांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडच्या कर्जतमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिस ठाण्यामध्येच दोन गटामध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटाने एकामेकांना बेदम मारहाण करत धारधार शस्त्रांनी वार केले. या घटनेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पोलिस समोर असताना देखील दोन्ही गट राडा करतच राहिले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी कर्जतमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली. महत्वाचे म्हणजे ही हाणामारी कर्जत पोलिस ठाण्यात झाली. या हाणामारीत कोयत्यांचा वापर करण्यात आला. तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या कोयता हल्ल्यात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र कर्जतमध्ये पाहायला मिळाले. पोलिसांच्या समोरच कोयता हल्ला करण्यात आल्यामुळे कर्जतमध्ये खळबळ उडाली आहे. या हाणामारीमध्ये महिला देखील होत्या. दोन कुटुंबातील हा वाद आहे. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की त्यांनी पोलिस ठाण्यातच राडा केला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पराविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

कडाव वडवली गावात घरासमोरील कठडा काढण्यास सांगितले यावरून दोन कुटुंबात हा वाद सुरु झाला. दोन्ही गट पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गावात झालेला वाद पोलिस ठाण्यात पुन्हा उफाळून आला. दोन्ही गट एकमेकांना भिडले. यावेळी कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रोशन मराडे, मोहन मराडे आणि प्रथम मराडे हे तिघे जण गंभीर जखमी झाले. यापैकी मोहन मराडे यांची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारांसाठी MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या हाणामारीचे व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT