Culprit arrested saam tv
मुंबई/पुणे

चाकुचा धाक दाखवून महिलेवर सामुहिक बलात्कार करणारे आरोपी गजाआड

धारावी परिसरात महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती.

सुरज सावंत

मुंबई : धारावी परिसरात एका महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. मुंबईतील धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ११ मे रोजी धारावी पोलिसांनी (Dharavi police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अनिल जुगदेव चौहान (१९) , निलेश जुगदेव चौहान (२०) अशी (two culprit arrested) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मुंबईतील विलेपार्लेच्या प्रेम नगर येथील रहिवासी आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पीडित महिला तिच्या घरी झोपली होती. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे अज्ञात इसमांनी संधीचा फायदा घेत तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. तोंडाला मास्क लावून आलेल्या नराधमांनी चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार केला. एक आरोपी मोबाईलवर व्हिडिओ बनवत होता. दोघांचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान आहे. अशी माहिती पीडित महिलेनं पोलिसांना दिली. त्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात बुधवारी ११ मे रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसी कलम ३७६,३७६ (डी), ४२५, ३५४, (अ) ३५४ (ब), ३५४ (डी), ५०६ (२) आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT