पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आज सोमवारी पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाढत्या महागाईबाबत इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील जे डब्लू मॅरियट हॉटेल बाहेर राष्ट्रवादीने आंदोलन (NCP Strike) सुरु केलं होतं. या आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण घडामोडींमुळं राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे येथील कार्यक्रमात दंडेली करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करतीलचं पण या महिला तुमच्या पक्षाच्या होत्या, तुमचं समर्थन आहे का या दंडेलीला ? भाजपच्या कार्यक्रमात येऊन दंडेली करायचा ठराव केलाय का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना केला आहे. राज्यात सरकार नावाचा प्रकार फक्त विरोधकांवर वरवंटा चालवण्यासाठी शिल्लक उरलाय, अशा शब्दात वाघ यांनी राज्य सरकारवरही हल्लाबोल केला आहे.
इराणी यांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं असतानाच भाजपकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. चित्रा वाघ यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करुन उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यावर टीका केलीय. पुणे येथे राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाबाबत बोलताना वाघ म्हणाल्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे येथील कार्यक्रमात दंडेली करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करतीलचं पण या महिला तुमच्या पक्षाच्या होत्या, तुमचं समर्थन आहे का या दंडेलीला ? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला आहे.
जसे तुमचे विद्यार्थी शोधा आणि तोडाचा फतवा जारी करतात, तसं महिलांनीही भाजपच्या कार्यक्रमात येऊन दंडेली करायचा ठराव केलाय का, याचं उत्तर द्या ? गृहमंत्री ही झोपलेत का ? भाजप च्या कार्यक्रमात जाऊन गोंधळ घालणार, त्यानंतर मारहाण केली म्हणून कांगावा करणार…वा रे बहाद्दर रणरागिणी…अशा शब्दात वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.