राजकारणामध्ये मोठ्या व्यक्तीच्या सल्लागार होण्याचे योग आहेत. धाडस आणि धडाडी वाढेल.
दिवसाची इतीश्री शुभ वार्तानी होईल. अनंत चतुर्दशीचा दिवस आहे विशेष गणेश उपासना आपल्याला फलदायी ठरेल.
नको असलेले सोपस्कार आज लांब ठेवलेले बरे. मनाला काय वाटतंय यापेक्षा बुद्धीचा कौल घेऊन कामे करा.
धार्मिक कार्यामध्ये सहभाग वाढेल. काही महत्त्वाच्या बैठका आणि निर्णय आज मार्गी लागतील. व्यवसायिक जोडीदाराकडून फायदा दिसतो आहे.
महत्त्वाचे जिन्नस आणि ऐवज आज जपणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी सावधगिरीने पावले उचला.
समोरच्याला बोलून गारद कराल. लॉटरीमध्ये आज नशीब आजमवायला हरकत नाही. दिवस चांगला आहे. विष्णू उपासना करावी.
अनंताची उपासना आपल्याला राशीला आज विशेष फल देणारी आहे. छोट्या धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभाग घ्याल.
लहान प्रवास घडतील. चुकीच्या गोष्टींचे सोपस्कार आज नकोतच. भावंड सौख्य चांगले राहील. शेजारी संवाद राहील.
धन योगाला दिवस उत्तम आहे. प्रॉपर्टीशी निगडित, वारसा हक्काशी निगडित, सुवर्ण किंवा धनाशी संबंधित निर्णय आज होतील कुटुंबीयांच्या सहकाऱ्यांनी पुढे जाल.
शांत राहून आनंद शोधाल. आपल्यामध्येच सत्व शोधाल. बुद्धी आणि आणि श्रम यामध्ये आज श्रम स्वीकारून कामाला लागाल.
चोर चोरी, महत्त्वाच्या ऐवज गहाळ होणे, चोरीला जाणे या गोष्टींपासून आज सावध रहा. मनाला मुरड घालून काही गोष्टी करावे लागतील. दिवस संमिश्र आहे.
आपल्या मित्र-मैत्रिणींकडून चार चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. आनंदामध्ये भर पडेल.