Water drowning
Water drowning saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! शेत तळ्यात पोहायला गेले अन् दोघांना मृत्यूनं गाठलं

साम टिव्ही ब्युरो

पुणे : येथील धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खंडोबा मंदिराजवळ असलेल्या शेत तळ्यात पोहायला गेलेल्या तीन मुलांपैकी (two person died) दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सुरज शरद सातपुते (१४) आणि पुष्कर गणेश दातखिंडे (१३) अशी मृतांची नावं आहेत. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच (Fire Brigade) अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन केंद्र तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मुलांचे (Water Drowning) तलावातून मृतदेह बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, धायरी परिसरात असलेल्या शेत तळ्यामधे तीन मुले पोहायला गेली होती. दोघे जण तळ्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिहंगड अग्निशमन केंद्र व पीएमआरडीए अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळं धायरी परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips: जड कानातले घातल्यानंतर तुमचेही कान दुखतात? मग या टीप्स ट्राय तर करा.

Skin Care Tips: चेहऱ्यावर कोरियन ट्रिटमेंट सारखा ग्लो हवाय? मग मधासोबत 'या' गोष्टी अप्लाय करा

Akola Crime: खिडकीतून आतमध्ये प्रवेश... अकोल्यात प्रसिद्ध उद्योजकाचे घर फोडले; २ कोटींचा मुद्देमाल लंपास

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये जाहीर सभा

Naach Ga Ghuma Film : "सगळं एकदम चोख, कौतुकासाठी शब्दच अपूरे..."; ‘नाच गं घुमा’ पाहताच प्राजक्ता माळी काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT