खेळता- खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून, २ चिमुरड्यांचा मृत्यू Saam Tv
मुंबई/पुणे

खेळता- खेळता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून, २ चिमुरड्यांचा मृत्यू

उद्यानाच्या सुशोभीकरण कामाकरिता कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयाच्या पाण्याचा पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उद्यानाच्या सुशोभीकरण कामाकरिता कंत्राटदाराने खोदलेल्या खड्डयाच्या पाण्याचा पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना अँटॉप हिलच्या सीजीएस कॉलनीजवळ घडली आहे. यशकुमार चंद्रवंशी (वय- ११) आणि शिवम जैस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

हे देखील पहा-

सीजीएस कॉलनी मधील सेक्टर ७ मध्ये उद्यान आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने उद्यानात मोठा खड्डा खणला असून तो उघडा असल्यामुळे पाण्याने भरला आहे. काम अर्धवट असताना देखील उद्यान सुरु असल्यामुळे परिसरातील लहान लहान मुले खेळण्याकरिता या उद्यानात जात असतात.

सोमवारी अनेक मुले खेळत असताना यशकुमार आणि शिवम संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास या खड्ड्यात पडले आहेत. पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले. इतर मुलांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना सांगितले. त्यांनी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना प्राचारण करण्यात आले. दोन्ही मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते.

मात्र, दाखल करण्या अगोदरच त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. यशकुमार आणि शिवम याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत असताना कंत्राटदाराविरुद्ध लोकांचा संताप आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांमार्फत रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT