'हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटीसेना;' तुषार भोसलेंचा शिवसेनेवर हल्लाबोल @AcharyaBhosale/SaamTV
मुंबई/पुणे

'हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटीसेना;' तुषार भोसलेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीदरम्यान ट्विटरवरती टाकलेल्या फोटोंवरुन भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसलेंनी सेनेवरती हल्लाबोल चढवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) या सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची मुंबईमधील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट घेतली आणि यावेळी त्यांनी राष्ट्रीय राजकारणासह लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा देखील केली.

हे देखील पहा -

तर संजय राऊत यांनीही या बैठकीत राजकारणावर चर्चा झाल्याचं ट्विटरवरुन सांगितलं होत. यावेळी त्यांनी ट्विटद्वारे 'शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बेंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली. ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या तेथे त्यांनी उद्धवजीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत झुकणार नाहीत असं ममता बॅनर्जी म्हणाल्या असल्य़ाच ट्विट संजय राऊतांनी केलं होत.

राऊत आणि आदित्य ठाकरेंनी यांनी घेतलेल्या ममता बॅनर्जींच्या भेटीदरम्यानचे फोटो ट्विटरवरती टाकले होते. याच फोटोंवरुन भाजप आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या आचार्य तुषार भोसलेंनी (Tushar Bhosale) सेनेवरती हल्लाबोल चढवला आहे. हा घ्या पुरावा, बदललेल्या शिवसेनेचा ! 'जय श्रीराम' चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण. असं ट्विट (Tweet) त्यांनी केलं असून त्याच ट्विटमध्ये हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना. असा घणाघाती आरोप त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT