FDA officials conduct inspections at hotels in Mumbai as authorities intensify action against hygiene and food safety violations. saam tv
मुंबई/पुणे

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

FDA Action in Mumbai : आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या विभागाने मुंबईतील तीन नामांकित हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द केले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द केले.

  • ही कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

  • भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील हॉटेल्स कारवाईच्या कक्षेत

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. काय कारवाई दरम्यान मुंबईतील लोकप्रिय आणि नामांकित अशा तीन हॉटेल्सचे अन्न परवाने रद्द करण्यात आले आहेत. भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील या हॉटेल्सवर ही कारवाई करण्यात आली. हॉटेल्समध्ये अस्वच्छता दिसली तरी थेट परवाना रद्द होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

परवाने रद्द का करण्यात आली आहेत?

शालिमार हॉस्पिटॅलिटी, नूर मोहम्मदी हॉटेल,रहमानिया रेस्टॉरंट या तीन मोठ्या हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेल्सची अचानक तपासणी केली. त्यावेळी तेथे स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

हॉटेल्सच्या स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता आढळून आली. किचनमध्ये कीटकांचा वावर दिसून आला. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची कोणतीही तपासणी केली नव्हती. हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी. तसेच वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी ठेवल्या गेल्या नव्हत्या. या त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे स्पष्ट करत एफडीएने थेट निलंबनाची कारवाई केलीय.

मुंबईतील ‘के. रुस्तम’चा परवाना रद्द

मुंबईच्या चर्चगेट भागातील प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लर 'रुस्तम'चा तदेखील परवाना रद्द करण्यात आलाय. या आउटलेटमध्ये जिवंत उंदीर, माश्या आणि एक्सपायरीचे खाद्यपदार्थ यांसारख्या गंभीर अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते. मुंबईसह एफडीएने आपला मोर्चा विदर्भाकडेही वळवलाय. अमरावती येथील प्रसिद्ध 'अमरावती दरबार' या हॉटेलला कोणतीही वैध अन्न परवाना नसताना व्यवसाय चालवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT