Ulhasnagar News अजय दुधाणे
मुंबई/पुणे

आदिवासी पाड्यांना मिळणार शुद्ध पाणी!उल्हासनगर जवळीळ हजारो नागरिकांना लाभ

सोहम फाऊंडेशनने उल्हासनगर (Ulhasnagar) जवळीळ आदिवासी पाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे या परिसरातील तीन हजारांहून अधिक रहिवाशांना नियमितपणे शुद्ध पेयजल मिळू लागले आहे.

अजय दुधाणे

उल्हासनगर - अशुद्ध आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांमधील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्यासाठी सोहम फाऊंडेशनने उल्हासनगर (Ulhasnagar) जवळीळ आदिवासी पाड्यांमध्ये शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे या परिसरातील तीन हजारांहून अधिक रहिवाशांना नियमितपणे शुद्ध पेयजल मिळू लागले आहे. ग्रामीण भागात अजूनही हजारो रहिवासी विहीरी आणि कुपनलिकांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पितात.

हे देखील पहा -

अनेकदा अशा पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार आणि विषारी घटक असतात. त्यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या अनेक उद्भवत होत्या. त्यामुळे सोहम फाउंडेशनने पाण्यातील अशुद्ध घटक वेगळे करणारी शुद्धीकरण यंत्रणा म्हसकळ, गोवेली आणि अनखर या तीन पाड्यांमध्ये बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे दर तासाला दोन हजार लिटर शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळते. सध्या सुरूवातीचे सहा महिने संस्थेतर्फे या योजनेचे विनामूल्य व्यवस्थापन केले जाणार आहे.

याकाळात ग्रामस्थांकडून कोणत्याही स्वरूपाची शुल्क न घेता त्यांना विनामूल्य पाणी दिले जाईल. दरम्यानच्या काळात गावातील महिला बचत गटाला या शुद्धीकरण प्रकल्पाची इत्यंभूत माहिती दिली जाणार आहे, किरकोळ, देखभाल दुरूस्तीचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाईल. सहा महिन्यानंतर गावातील महिला या योजनेची देखभाल करणार आहेत. तेव्हा मात्र रहिवाशांना अत्यल्प का होईना पाणीपट्टी द्यावी लागेल. त्याच लोकवर्गणीतून योजनेचा देखभाल खर्च भागवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

घरातली लोक झोपलेली, दाराची कडी लावली अन् स्मार्ट मीटर बसवून गेले; महावितरणचा गजब कारभार

कांद्याची झणझणीत भाजी; अवघ्या १५ मिनिटांत करा ही चवदार रेसिपी

SCROLL FOR NEXT