trekker dies after falling at Chanderi Fort near Badlapur Saam Tv
मुंबई/पुणे

घनदाट जंगल अन् खोल दरी, गडावरून कोसळून गिर्यारोहकाचा करुण अंत; अथक प्रयत्नानंतर बॉडी सापडली; अंगावर शहारे आणणारी घटना

Trekker Dies After Falling At Chanderi Fort: बदलापूरजवळील चंदेरी गडावर ट्रेकिंगदरम्यान दरीत कोसळून एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. २४ तासांच्या शोधानंतर रेस्क्यू टीमने मृतदेह सापडला.

Omkar Sonawane

बदलापूरजवळील ऐतिहासिक चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका गिर्यारोहकाचा पाय घसरून दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित गुप्ता असे मृत गिर्यारोहकाचे नाव असून तो टिटवाळा येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोहित गुप्ता आणि त्याचा मित्र अजय पंडम हे दोघे १ तारखेला चंदेरी गडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. ट्रेक पूर्ण करून परतीच्या प्रवासात असताना अचानक रोहितचा पाय घसरला आणि तो सुमारे ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच रोहितचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच बदलापूर आणि लोणावळा येथील रेस्क्यू टीम, स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, दाट जंगल, खोल दरी आणि अवघड परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अखेर २४ तासांच्या अथक शोधानंतर रोहितचा मृतदेह दरीत आढळून आला. त्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीने मोठ्या शिताफीने मृतदेह गडाखालपर्यंत आणण्यात आला. ही मोहीम अत्यंत जोखमीची आणि आव्हानात्मक होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT