IAS Pooja Khedkar Saam Digital
मुंबई/पुणे

Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकर परदेशात पळून गेली? अटकेच्या भीतीने फरार झाल्याची चर्चा

Pooja Khedkar UPSC News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पसार झाल्याची चर्चा रंगली आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेच्या भीतीने पूजा खेडकर पसार झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने गुरुवार पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सध्या पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे.

त्यामुळे ती भारतातून थेट परदेशात पसार झाली असावी, असं सूत्रांनी सांगितलं आहे. अर्थातच याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. इतर मागासवर्ग प्रवर्गातून पूजाने १२ वेळा UPSC परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे.

त्याचबरोबर तिचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील खोटे असल्याचं सांगितलं जातंय. याप्रकरणी युपीएससी बोर्डाने पूजाचे तातडीने प्रशिक्षण थांबवून तिला मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात परत बोलावले होते. मात्र, पूजा खेडकर तिथे न जाताच नॉट रिचेबल झाली. याप्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) दिल्ली पोलिसांत पूजा खेडकर विरोधात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तिला चौकशीसाठी हजर राहण्यास समन्स देखील बजावले. पण पूजा खेडकर चौकशीला हजर राहिली नाही. अटकेच्या भीतीने तिने दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज केला. या अर्जावर सुनावणी घेताना कोर्टाने पूजाचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

त्यामुळे पूजाला केव्हाही अटक होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशात पळून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, पूजा खेडकर हिचे अनेक मोठे कारनामे समोर येत आहेत. चुकीच्या पद्धतीने आयएएसची परीक्षा दिल्यानंतर पूजाने मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत वारंवार गैरवर्तन केले होते. त्यामुळे अकादमीने तिला 8 वेळा मेमो दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विजयाचा साताऱ्यात जल्लोष, पाहा व्हिडीओ

Karisma Kapoor : 'वो मत डालना...' चुलत भावाच्या रोक्याला पोझ देताना करिश्मा कपूरचा पाय घसरला अन् पडता पडता वाचली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

SCROLL FOR NEXT