Mumbai Local News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : मुंबईत धावत्या ट्रेनमधून २ तरुण पडले, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

Mumbai Local Accident : मुंबईत वसई-नायगावदरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे. दरवाज्यातून लटकून प्रवास करताना तोल गेल्याने भीषण अपघात घडला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • मुंबई लोकलमधून पडून भीषण अपघात

  • धावत्या गाडीतून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू

  • दुसरा तरुण गंभीर जखमी

  • पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत

मनोज तांबे, विरार

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये लटकून प्रवास करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध हा अपघात झाला आहे. मृत तरुणाचे नाव प्रतीश बाळाराम भोले असे असून नानासाहेब मदने यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.

मुंबईतील लोकल अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्टेशन दरम्यान लोकलला लटकून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आज सकाळच्या सुमारास वसई नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी चर्चगेटकडे एक लोकल रवाना झाली.

या लोकलमधून प्रतीश बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघे प्रवास करत होते. लोकलच्या दरवाज्यात उभे राहून हे दोघेही प्रवास करत असल्याने तोल जाऊन धावत्या गाडीतून दोघेही खाली कोसळले. या दुर्घटनेत प्रतीश बाळाराम भोले याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नानासाहेब मदने या तरुण गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, तर बहिणीचा बदलला धर्म

Maharashtra Politics : महायुती २ डिसेंबरनंतर फुटणार? भाजपच्या रवींद्र चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण, VIDEO

Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

Arranged Marriage Communication: लग्नाआधी होणाऱ्या जोडादारासोबत फोनवर काय बोलावे?

एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ अन् अश्लील हातवारे; दोन तरुणींच्या गटात जोरदार हाणामारी,VIDEO

SCROLL FOR NEXT