pune Shocking News Saam tv
मुंबई/पुणे

Shocking : ७ वर्षांच्या नरेंद्रनं डोक्यावर मायेनं हात फिरवला, पिसाळलेल्या कुत्र्यानं जबडाच फाडला; १५-२० फूट फरफटत नेलं

pune Shocking : ७ वर्षांच्या नरेंद्रला पिसाळलेल्या कुत्र्याच्या डोक्यावर मायेनं हात फिरवणं महागात पडलं. पिसाळलेल्या कुत्र्यानं त्याचा जबडाच फाडला.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यात ७ वर्षांच्या मुलासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका सुरक्षा रक्षकाच्या ७ वर्षीय मुलाला कुत्र्याच्या डोक्यावर मायेने हात फिरवणं महागात पडलं आहे. पिसाळलेल्या या कुत्र्याने ७ वर्षीय मुलावरच हल्ला केला आहे. कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात ७ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या गालााची शस्त्रक्रिया करण्यात आली.

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या शिवाजीनगर, मॅाडेल कॉलनी परिसरात एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या शेर बहादूर बिस्ता (मूळ नेपाळ) यांचा अवघा सात वर्षाचा मुलगा नरेंद्र बालमित्रासोबत मॉडेल कॅालनीतील महापालिकेच्या 'चित्तरंजन वाटिका' उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. उद्यानात आलेल्या भटक्या (श्वान) कुत्र्याच्या डोक्यावरून तो प्रेमाने, मायेने हात फिरवत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून, गालाला चावा घेतला. पंधरा ते वीस फूट फरफटत नेले.

७ वर्षीय नरेंद्र याच्या मित्राने कुत्र्याला दगड मारल्याने सुदैवाने त्याची सुटका झाली. मात्र, पिसाळलेल्या कुत्र्याने या मुलाचा जबडा फाडल्याने मोठी जखम झाली. त्यामुळे त्याला तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु गालाची शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते.

मुलाच्या पालकांनी मॅाडेल कॅालनीतील समाजिक कार्यकर्ते रविद्र साळेगावकर यांच्या माध्यमातून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी संपर्क केला. सिद्धार्थ शिरोळेंनी दिनानाथ रूग्णालयचे प्रशासक सचिन व्यवहारे यांच्याशी संपर्क करून मुलावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

धर्मादाय योजनेतून डॉ. कौस्तुभ प्रभूणे यांनी प्लास्टिक सर्जरी यशस्वीरित्या पार पाडली. या उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मुलाच्या उपचासाठी जवळपास पंचवीस हजार रूपये वर्गणी गोळा केले. त्यानंतर ही रक्कम औषधोपचासाठी दिले आहेत. या घटनेतून मुलगा थोडक्यात वाचला आहे. या उद्यानात सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यावर काम थांबवण्याची कार्यवाही महापालिकेकडून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT