Ulhasnagar : राज्य सरकारची १०० दिवसांची मोहिम; उल्हासनगर महापालिका आयुक्त ठरल्या राज्यात अव्वल

Ulhasnagar News : राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : राज्य सरकारकडून कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम राबविण्यात आली. साधारण १०० दिवसांची हि मोहीम होती. या मोहिमेमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळाले आहेत. यानंतर आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे.

राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यामध्ये राज्यातील एकूण ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे. तसेच कोणाचे काम अव्वल राहिले याचा लेखाजोखा देखील देण्यात आला आहे. 

Ulhasnagar News
Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी संकटाची टांगती तलवार; आंबेबारा धरणांने गाठला तळ

आयुक्त आव्हाळे यांना मिळाला ९० दिवसांपेक्षा कमी कालावधी  

मनीषा आव्हाळे या अतिशय तरुण आयएएस अधिकारी असून आयुक्त म्हणूनही त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे. दरम्यान मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून जानेवारी महिन्यात नियुक्ती झाली होती. याच दरम्यान राज्य सरकारने कार्यालयीन सुधारणांसाठी १०० दिवसांची विशेष मोहीम सुरू केली होती. त्यात मनीषा आव्हाळे यांना ९० दिवसांपेक्षाही कमी वेळ मिळाला. 

Ulhasnagar News
Badlapur : अमेरिकेसह जगभरात ३३ रुपयांत मिळणार मेड इन इंडिया 'देवाभाऊ' चष्मा; काठमांडूतील जागतिक परिषदेत शिक्कामोर्तब

राज्यातील महापालिका आयुक्तात ठरल्या प्रथम 

मात्र या कालावधीत त्यांनी प्रशासनात लक्षणीय बदल केले. यात त्यांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ झटकून त्यांनी नवचैतन्य निर्माण केलं आणि नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक टीम तयार केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळाले. त्यामुळे त्यांचा राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. त्यातच त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com