Pune Drunk And Drive Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Pune Drunk And Drive Accident News : पुण्यात मद्यधुंद कारचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले असून तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हमुळे भीषण अपघात

  • डिलिव्हरी बॉयच्या छातीवरून कारचे चाक गेले

  • डिलिव्हरी बॉयच्या बरगड्या फॅक्चर

  • मद्यधुंद चालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

अक्षय बडवे, पुणे

पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अनेक जणांचे नाहक बळी जातात. अशाच प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा एकदा पुण्यातून समोर आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह करत एका चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डिलिव्हरी बॉयला चिरडलं असल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत डिलिव्हरी बॉय गंभीर झाला असून त्याच्या छातीवरुन गाडीचे चाक गेल्याने बरगड्या फॅक्चर झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाचे नाव प्रसाद दिलीप मिसाळ (वय २६) असे आहे. आणि आरोपी चालकाचे नाव तेजस बाबुलाल चौधरी असे आहे. प्रसाद हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. चांदणी चौकाजवळ ऑर्डर आल्याने त्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावली आणि तो थांबला.

याचवेळी पाठीमागून भरधाव कार आली. तिने प्रसाद याला धडक दिली. तो खाली पडल्यावर कारचे चाक त्याच्या छातीवरुन गेल्याने त्याच्या बरगड्या फॅक्चर झाल्या. हाता पायांना मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याने गुरुवारी त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

डॉक्टरांनी चालकाची तपासणी करुन त्याने मद्य प्राशन केले असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी सदर चालकावर ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आला असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत पोलीस पुढील तपास करत असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT