boat accident AP
मुंबई/पुणे

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

boat accident : 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाल्याची घटना घडली. या घटनेत शेकडो जण बेपत्ता झाले आहेत.

Vishal Gangurde

३०० प्रवाशांचं जहाज हिंद महासागरात बुडाल्याची धक्कादायक घटना

थायलंड-मलेशिया सीमेजवळ हे जहाज उलटले

आतापर्यंत १० प्रवाशांना वाचवण्यात आलंय, शेकडो प्रवासी बेपत्ता

वाचवलेल्यांमध्ये रोहिंग्या मुस्लिम नागरिकांचा समावेश

म्यानमारहून ३०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज हिंद महासागरात बुडाल्याची घटना घडली आहे. थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळील हिंद महासागरात हे जहाज उलटले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर १० प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. जहाज बुडाल्याची माहिती मिळताच रेस्क्यू टीम मदतीला धावली. या दुर्घटनेनंतर शेकडो प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

समुद्रात जहाज नेमकं कोणत्या कारणामुळे बुडाले, याचा शोध घेतला जात आहे. रेस्क्यू टीमने समुद्रात बुडालेल्या शेकडो लोकांचा शोध घेणे सुरु केले आहे. हे जहाज नेमकं कधी आणि किती वाजता बुडाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे जहाज थायलंडच्या जलक्षेत्रात उलटले. या भागात प्रवाशांना लुटणारे समुद्री चाचे मोठ्या प्रमाणावर आढळतात. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'वाचवण्यात आलेल्या लोकांमध्ये रोहिंग्या मुस्लिम नागरिकांचा समावेश आहे. जे प्रामुख्याने म्यानमारमध्ये राहतात. या नागरिकांना गेल्या अनेक दशकांपासून अत्याचाराचा सामना करावा लागत आहे.

मलेशियातील एजेन्सीचे एडमिरल रोमली मुस्तफा यांनी म्हटलं की, प्राथमिक तपासात समजत आहे की, 'हे जहाज रखाइन राज्यातील बुथीदांग शहरातून रवाना झाले होते. हे जहाज तीन दिवसांआधी बुडाले. मलेशियातील एका समद्र किनाऱ्यावर अनेक लोक वाहून आले होते. त्यानंतर बचाव अभियान सुरु करण्यात आलं.

म्यानमारमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह देखील वाहून किनाऱ्यावर आला होता. आतापर्यंत कमीत कमी १० लोकांना वाचवण्यात आलं आहे. त्यात एक बांगलादेश आणि म्यानमारच्या लोकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

SCROLL FOR NEXT