Lonavala Traffic Today Saam TV
मुंबई/पुणे

Traffic Update: भीमाशंकर परिसरात मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या ५ किलोमीटपर्यंत रांगा, पोलिसांची दमछाक

Satish Daud

Traffic Update in Maharashtra

विकेंड आणि नाताळ सणामुळे शाळा, महाविद्यालयांना सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनस्थळावरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे अनेक भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला रविवारी भाविकांसह पर्यटकांनी भेट दिली.

त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रविवारी रात्री वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने वाहनचालकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भीमाशंकर परिसरात जवळपास ५ किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस रात्रभर कसरत करीत होते, असं परिसरातील नागरिकांनी सांगितलं.

शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्याने आणि नाताळ सण असल्याने अनेक जण लोणावळ्यात पर्यटनासाठी येण्याची शक्यता होती. यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही, याची पोलिसांकडून काळजी घेण्यात आली होती.

घाटांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात आलं होतं. ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलीस देखील कार्यरत होते. मात्र, काही बेशिस्त वाहनचालकांमुळे भीमाशंकर परिसरात वाहतूक कोंडी झाली.

ही कोंडी इतकी वाढली, की वाहनांच्या ५ किलोमीटपर्यंत रांगा लागल्या. पोलिसांची मात्र वाहतूक कोंडी सोडवताना मोठी दमछाक झाली. दुसरीकडे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर देखील रविवारी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनांची संख्या अधिक असल्याने अवजड आणि जड वाहनांनी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या या आवाहनाला अनेकांनी केराची टोपली दाखवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT