Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte Saam TV
मुंबई/पुणे

ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले पण...; गुणरत्न सदावर्तेंची कबुली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक निवासस्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांना भडकविल्या प्रकरणी आरोपी आणि सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी एसटी कामगारांकडून (ST) जे पैसे घेतले त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य बदलले आहे. आता ते, 'मी फी म्हणून एसटी कामगारांकडून ते पैसे घेतल्याचे ते बोलत आहेत अशी माहीती सरकारी वकील प्रदीप घरत (Pradip Gharat) यांनी दिली आहे. ते आज न्यायालयातील सुनावणी नंतर पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेच्या घरातून पैसे मोजायची मशीन, दोन रजिस्टर ताब्यात घेतली असून त्यांच्या काही मालमत्ता आणि केरळमधून घेतलेल्या गाडीबाबतच्या चौकशीसाठी सदावर्तेंची कस्टडी मागितली होती. मात्र, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur) ताबा मागितला असून त्यांना तो दिला जाईल. असं सांगतानाच सदावर्तेंनी यांनी आधी आपण कामगारांकडून जे पैसे घेतले त्या संदर्भातील वक्तव्य बदललं आहे. आपण फी म्हणून एसटी कामगारांकडून (ST Employee) ते पैसे घेतले असल्याचं सदावर्ते म्हणत आहेत असंही घरत यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण -

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavartes) यांनी ST कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा त्यांच्यावर संपाच्या सुरुवातीपासून आरोप करण्यात येत होता.

दरम्यान, डिसेंबर महिन्यापासून संपात सहभागी असलेले पुण्यातील एका एसटी कर्मचाऱ्याने सदावर्तेंना पैसे देत होते. ही रक्कम कॅशच्या स्वरूपात मागितली जायची; असेही या कर्मचाऱ्याने सांगितले होते. पहिल्या महिन्यात ५४० रुपये त्यानंतर प्रत्येकी कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये अगाऊ रक्कम घेतली गेली. आंदोलनात सहभागी असलेल्या पुण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कॅश स्वरूपात रक्कम दिली. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, स्वारगेट विभागातील कर्मचाऱ्यांनी पैसे दिले. याची एक नोंदवही करण्यात आली असल्याची

सदावर्तेंचा जामीन २१ एप्रिल रोजी -

गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) जामिनासाठी अर्ज दाखल केला असून अप्पर सेशन कोर्टाचे न्यायधीश आर एम सादराणी यांच्या कोर्टासमोर दाखल केला असून या जामिन अर्जावर २१ एप्रिल ला सुनावणी होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

SCROLL FOR NEXT