Toilet door theft Saam Tv
मुंबई/पुणे

Toilet Door Theft : अंबरनाथमध्ये शौचालयांचे दरवाजे जातायत चोरीला; चक्क छत्री घेऊन बसण्याची वेळ

नागरिकांवर चक्क छत्री घेऊन बसण्याची वेळ

अजय दुधाणे

Ambernath Latest News : आंबेरनाथयेतून एक अजब चोरीची घटना उघडकीस आली आहे. अंबरनाथ शहरात चोरट्यांनी चक्क सार्वजनिक शौचालयांचे दरवाजे चोरायला सुरुवात केली आहे. या चोऱ्यांमुळे अंबरनाथ पालिकाही हतबल झाली असून परिणामी नागरिकांवर मात्र चक्क छत्री घेऊन शौचालयात जाण्याची वेळ आली आहे.

अंबरनाथ (Ambernath) पूर्वेतील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत स्थानिकांना विचारलं असता पालिकेने दोन वेळा दरवाजे बसवले, मात्र हे दरवाजे वारंवार कोणीतरी चोरून नेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

मात्र, आता दरवाजे नसल्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असून नागरिकांना चक्क छत्र्या घेऊन शौचालयात जाण्याची वेळ आली आहे. अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरातील मधली आळी आणि कैलास नगर परिसरातील शौचालयांचे दरवाजे अशाच पद्धतीने चोरीला (Theft) गेले आहेत.

महिला आणि पुरुष अशा दोन्ही शौचालयांमधले दरवाजे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर इथे दरवाजे बसवावेत अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

'भोजपुरीमध्ये बोलून दाखव...' उत्तर प्रदेशमध्ये मराठी तरुणाला दमदाटी|VIDEO

SCROLL FOR NEXT