Today Maharashtra Weather News Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्याच्या तापमानात किंचित वाढ, पण 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Today Maharashtra Weather News : महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला असून अनेक जिल्ह्यांत उकाडा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला

  • अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा जाणवत आहे

  • उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज

  • हवामान बदलाचा आरोग्य आणि शेतीवर परिणाम

राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. काही प्रमाणात ढगाळ हवामान आणि कमाल तापमानात झालेल्या वाढीने उकाडा जाणवत आहे. आज किमान तापमानात वाढ कायम राहून, अंशतः ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवत आहे.

हवामान विभागानुसार, काल म्हणजे बुधवारी २१ जानेवारी रोजी राज्यातील धुळे येथे १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे १०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.

राज्यात काल पासून गारठा कमी झाला असून आज देखील किमान तापमानातील वाढ कायम आहे. शिवाय अंशतः ढगाळ हवामानाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानात होणाऱ्या सततच्या बदलावामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापमान बदलावाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत असून त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे. दरम्यान मकरसंक्रांतीनंतर हवामानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Strawberry Pudding : घरच्या घरी बनवा टेस्टी स्टॉबेरी पुडींग लहान मुले ही खातील आवडीने , लगेचच नोट करा रेसिपी

BJP–AIMIM Alliance : भाजप-एमआयएमची पुन्हा अभद्र युती, सत्तेसाठी भाजपचा नवा डाव, कुणाला कोणतं पद मिळाले?

Nandu Parab : ...याचा संबंध भाजपशी, नंदू परब यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर राजकारणात वादळ

Nahur Airoli Flyover: नाहूर ते ऐरोली फक्त २५ मिनिटांत, नव्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची कटकट संपणार

Crime News : आरडीचे पैसे भरायला गेले ते परत आलेच नाही, गडचिरोलीतील 'त्या' हत्याकांडाबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT