Maharashtra Rain Update News Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट! अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट; फळबागा, पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

Maharashtra Rain Update News : महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीने अनेक जिल्ह्यांत हजेरी लावली असून द्राक्ष आणि आंबा बागांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट

  • नाशिक, अकोला, जालना जिल्ह्यांत नुकसान

  • द्राक्ष आणि आंबा बागांना मोठा फटका

  • हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज

Mahrashtra Today Rain Update News राज्यात उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाने जोर धरला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली आहे. तर तुरळक ठिकाणी गारपीटीने तडाखा दिला. तसेच उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

नाशिकमध्ये गुढी पाडव्याच्या सणावर पावसाचं सावट

एकीकडे आज सर्वत्र गुढी पाडव्याच्या सणाचा आनंद सुरु असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारा व अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून कडक ऊन आणि दुपारनंतर आकाश भरून येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडेमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. गारपिटीमुळे द्राक्षाच्या बागांना,व द्राक्षांना फटका बसला आहे,तर देवगाव मानोरी सह अन्य गावात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

अकोल्याला अवकाळी पावसाने झोडपलं

अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. याचा फळ बागांना जोरदार फटका बसला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सावरा, मोहाळा, वडनेर गंगईसह १५ ते २० गावात गारिपीटसह पाऊस झाला. जवळपास २० ते २५ मिनिटं गारपिट आणि पाऊस सुरू होता. या गारपीटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.

जालना जिल्ह्यात अवकाळी गारांचा पाऊस

आज हवामान खात्याने जालना जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला होता. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार आज दुपार पासून जालना शहरात काही भागात अवकाळी गारांचा पाऊस पडला आहे. अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यातील कांदा उत्पादकासह फळबागातदारांची चिंता वाढली आहे.दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी विशेषतः फळ बाग शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.

शिम जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दुपारनंतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, रिसोड तालुक्यातील मोप परिसरात तूरळक गारपीट झाली.असून,या बदलत्या हवामानामुळे काढणीला आलेली हळद,बिजवही कांदा तसेच आंबा फळबागांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं, रिसोडमध्ये गारपीट

Banana Benefits: महिनाभर दररोज एक केळी खाल्ल्यास काय होतो फायदा?

गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबई-पुणे हायवेवर अपघाताचा थरार; IIT मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

ZP Teacher Transfer Scam : शिक्षक बदलीत मोठा घोटाळा, ३०० जणांवर कारवाई होणार

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मध्ये पंतप्रधान मोदींचा खरोखरच कॅमिओ? व्हायरल सीनमागील सत्य आले समोर

SCROLL FOR NEXT