Railway Mega block on Sunday May 31  saam tv
मुंबई/पुणे

टिटवाळा स्थानकात १५ दिवसांचा मोठा मेगाब्लॉक! १५ दिवस लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार; अनेक गाड्या रद्द

Titwala mega block : टिटवाळा स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. २ ते ८ सप्टेंबरदरम्यान अनेक लोकल रद्द असून काही गाड्या ठाणे आणि कल्याणपर्यंतच धावणार आहेत.

Namdeo Kumbhar

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर १५-डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी टिटवाळा स्थानकात प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी मध्य रेल्वेने २८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत दररोज ५ ते ६ तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या १५ दिवसांच्या ब्लॉकचा दुसरा टप्पा २ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राबवला जाणार आहे.

दररोज मध्यरात्री १२:०० ते पहाटे ०५:०० या वेळेत घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे टिटवाळा ते कसारा दरम्यान लोकल गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांपर्यंतच चालवल्या जातील. याशिवाय लांब पल्ल्याच्या अनेक मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

रद्द करण्यात आलेल्या लोकल गाड्या

डाऊन सेवा (२ ते ८ सप्टेंबर):

CSMT वरून सुटणाऱ्या: २२:०० व २२:५० (टिटवाळा लोकल), १०:०० व २०:४१ (कुर्ला लोकल), २२:४७ व ००:०८ (कसारा लोकल), ०८:०८ (ठाणे लोकल).

ठाणे / कुर्ला वरून सुटणाऱ्या: ०५:३५ (ठाणे - टिटवाळा) आणि १७:५९ (कुर्ला - कल्याण).

(टीप: ३/४ सप्टेंबरच्या रात्री कल्याण - आसनगाव पहाटे ०५:२८ ची लोकल देखील रद्द राहील).

अप सेवा (२ ते ८ सप्टेंबर):

टिटवाळा वरून सुटणाऱ्या: ०६:१३, २१:०० व २२:०६ (CSMT लोकल) आणि ०८:०९ (परळ लोकल).

इतर स्थानकांतून सुटणाऱ्या: ०९:०८ (ठाणे - CSMT), १९:०२ (कल्याण - CSMT) आणि ०३:५१ (कसारा - CSMT).

शॉर्ट टर्मिनेट / ओरिजिनेट होणाऱ्या गाड्या

CSMT वरून सुटणाऱ्या २३:१६ आणि २३:४२ च्या टिटवाळा लोकल ठाणे स्थानकापर्यंतच चालवल्या जातील.

टिटवाळा येथून सुटणाऱ्या ०३:५६ आणि ०४:३२ च्या लोकल अनुक्रमे ठाणे (०४:४४) आणि कल्याण (०५:१९) येथून सुटतील.

दिवसभरात टिटवाळासाठी सुटणाऱ्या काही वातानुकूलित (AC) आणि सामान्य लोकल ठाणे किंवा कल्याण स्थानकावरच रोखल्या जातील.

ब्लॉक कालावधीतील पहिली व शेवटची लोकल

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल:

डाऊन मार्ग: CSMT वरून कसारासाठी २१:३२ वाजता, तर टिटवाळासाठी २१:२० वाजता.

अप मार्ग: कसारा वरून CSMT साठी २२:०० वाजता, तर आसनगाववरून ठाण्यासाठी २३:०८ वाजता.

ब्लॉकनंतरची पहिली लोकल:

डाऊन मार्ग: CSMT वरून कसारासाठी पहाटे ०४:१९ वाजता.

अप मार्ग: कसारा वरून CSMT साठी पहाटे ०४:५९ वाजता, तर टिटवाळावरून ०५:११ वाजता.

एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत झालेला बदल

ब्लॉकच्या कालावधीत खालील प्रमुख एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पुनर्नियोजित (Rescheduled) करण्यात आल्या आहेत:

पाटलीपुत्र एक्सप्रेस (12141): LTT वरून पहाटे ०४:१५ वाजता सुटेल.

अमृतसर एक्सप्रेस (11057): CSMT वरून पहाटे ०४:०० वाजता सुटेल.

महानगरी एक्सप्रेस (22177): CSMT वरून पहाटे ०४:१५ वाजता सुटेल.

कुशीनगर एक्सप्रेस (22538): LTT वरून पहाटे ०४:४५ वाजता सुटेल.

पुरी एक्सप्रेस (22865) / भुवनेश्वर एक्सप्रेस (12879) / हातिया एक्सप्रेस (12811): LTT वरून पहाटे ०४:३० वाजता सुटतील.

मार्ग्यत थांबवण्यात येणाऱ्या (Regulated) एक्सप्रेस:

गोरखपूर-दादर, बलिया-दादर, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, हावडा-CSMT मेल आणि नंदीग्राम एक्सप्रेस यांसारख्या गाड्या वासिंद, आटगाव, खर्डी, कसारा आणि इगतपुरी स्थानकांवर २० मिनिटांपासून ३ तासांपर्यंत थांबवून चालवल्या जातील.

देवगिरी, मंगलाद्वीप, पंजाब मेल, नागपूर दुरंतो आणि हावडा दुरंतो या गाड्या मुंबईत आपल्या अंतिम स्थानकावर ३० ते ४० मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, वकिलांची टीम मातोश्रीबाहेर पोहोचली

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी! कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द; हुबळीतूनच दिल्लीला रवाना

नवीन कपडे न धुताच घालताय? आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठा पश्चाताप!

SCROLL FOR NEXT