NCB and local police seize MD drugs worth ₹5 crore during a late-night raid in Titwala, arresting a key महिला suspect. Saam tv
मुंबई/पुणे

कल्याण हादरलं! भाड्याच्या घरातून ५ कोटींचे ड्रग्स जप्त, मास्टरमाइंड महिलेला बेड्या

₹5 Crore MD Drugs Seized In Titwala By NCB And Police: टिटवळा येथे एनसीबी आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली असून ड्रग्स नेटवर्कवर मोठा आघात झाला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: टिटवळा परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एनसीबी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त केला आहे. या प्रकरणात ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या भाड्याच्या घरातून सुमारे २ किलो ३०० ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. यामध्ये एमडीएमए आणि एमडी बटन या प्रकारांचा समावेश आहे. शनिवारी उशिरा रात्री पद्मावती सोसायटी येथे छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईचा धागा १५ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या एका वेगळ्या ड्रग्स प्रकरणाशी जोडला गेला आहे. त्या प्रकरणातील आरोपीच्या चौकशीतून या महिलेचे नाव समोर आले होते. ती ड्रग्स पुरवठा साखळीतील महत्त्वाची कडी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी आणि कल्याण तालुका पोलिसांनी सापळा रचत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि छापा टाकत तिला अटक केली. या अचानक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेली महिला मूळची नवी मुंबई येथील असून ती गेल्या दीड महिन्यापासून टिटवळ्यात भाड्याने राहत होती. या कालावधीत ती स्थानिक पातळीवर ड्रग्स वितरणात सक्रिय होती का?याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी एनसीबीने तपास अधिक व्यापक केला असून, मुंबई आणि ठाणे परिसरातील ड्रग्स नेटवर्कला या कारवाईमुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Kolte Photos: 'रूपाची खाण, दिसायला छान', बिग बॉस विजेती तन्वीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Shivaji Maharaj Brother: इतिहासातील गूढ व्यक्तिमत्त्व; शिवाजी महारांजांचे बंधू संभाजी राजे भोसलेंच्या मृत्यूचं कारण काय?

Jhalmuri Recipe: घरच्या घरी कशी बनवायची पंतप्रधान मोदींना आवडलेली झालमुडी?

Maharashtra News Live Update: अकोला नाका ते राजाकिन्ही हा मुख्य रस्ता झालाय धोक्याचा; दिवसभर प्रचंड वाहतूक कोंडी

नाशिकनंतर भोंदूच्या कृत्याने मुंबई हादरली! फकीर इरफान महिलांवर करायचा अत्याचार, मोडस ऑपरेंडी नेमकी काय?

SCROLL FOR NEXT